ट्रकची स्कुटीला धडक चिमुकली ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:07+5:30
राशी जितू गद्दलवार (६) रा. छोटा गोंदिया असे मृत चिमुकलीचे नाव सांगितले जाते. ट्रक क्रमांक यूपी. ७८ सीटी ४९३३ हा साहित्य घेऊन गोंदियात आला होता. तो गौशाला वार्डातून जात असताना स्कुटी क्रमांक एमएच ३५ झेड ७३२८ या स्कुटीला एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. त्याच्या स्कुटीवर मागे राशी गद्दलवार बसली होती. ट्रकने समोरासमोर धडक झाल्याने राशीचा जागीच मृत्यू झाला.

ट्रकची स्कुटीला धडक चिमुकली ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराच्या गौशाला वॉर्डातील महाराष्ट्र बँकेजवळ हैद्राबाद लखनऊ रोड लाईन्सच्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने एक सहा वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. यात स्कुटी चालविणारा अल्पवयीन मुलगाही जखमी झाला आहे. ही मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता सुमारास घडली.
राशी जितू गद्दलवार (६) रा. छोटा गोंदिया असे मृत चिमुकलीचे नाव सांगितले जाते. ट्रक क्रमांक यूपी. ७८ सीटी ४९३३ हा साहित्य घेऊन गोंदियात आला होता. तो गौशाला वार्डातून जात असताना स्कुटी क्रमांक एमएच ३५ झेड ७३२८ या स्कुटीला एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. त्याच्या स्कुटीवर मागे राशी गद्दलवार बसली होती. ट्रकने समोरासमोर धडक झाल्याने राशीचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.
तीन विद्यार्थिनींना कारची धडक
रावणवाडी : भरधाव कारने शाळेतून पायी घराकडे जात असलेल्या तीन विद्यार्थिनींना धडक दिली. यात १ विद्यार्थिनी गंभीर तर दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोंदिया-बालघाट मार्गावरील सावरीजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार सावरी येथील मेघा योगराज बिसेन, हिना लेकराम बघेले, प्राची लोकराम बघेले या इयत्ता नववी व आठवीच्या तीन विद्यार्थिनी रावणवाडी येथील गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित जीईएस शाळेत शिक्षण घेतात. मंगळवारपासून (दि.३) १० वीची परीक्षा सुरू झाल्याने शाळा सकाळ पाळीत ठेवण्यात आली होती. सकाळी शाळेत गेलेल्या मुली घरी परतत असताना सावरी येथील बसस्थानकाजवळ बालाघाटच्या दिशेने भरधाव वेगात धावणाऱ्या इंडिका क्र.एमएच ३५ पी ३२०६ ने त्यांना धडक दिली.यात त्या तिन्ही विद्यार्थिनी जखमी झाल्या. यातील प्राची आणि हिना या दोघींवर गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले. तर मेघा बिसेन हिच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती सावरी व परिसरातील गावात पोहचतात गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच धडक देणाºया कारची तोडफोड करुन रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे घटनास्थळावर काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. रावणवाडी पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी कारचालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.