शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा परिसरातील अनेक गावांचा होतोय कायापालट

By admin | Updated: September 15, 2014 00:13 IST

गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या तिरोडा शहराचा आणि या परिसरातील लगतच्या गावांचा आता दिवसेंदिवस चांगलाच कायापालट होत आहे. जवळच असलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र

तिरोडा : गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या तिरोडा शहराचा आणि या परिसरातील लगतच्या गावांचा आता दिवसेंदिवस चांगलाच कायापालट होत आहे. जवळच असलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला भेट देणारे पर्यटक आणि येथील अदानी प्रकल्पाच्या निमित्ताने वाढलेली वर्दळ यामुळे येथे स्वयंरोजगाराला चालना मिळत असून नागरिकांच्या राहणीमानातही बराच फरक पडल्याचे दिसून येत आहे.औद्योगिक विकासापासून दूर असलेल्या गोंदिया जिल्ह्याला राज्यातील सर्वात जास्त क्षमतेच्या (३३०० मेगावॅट) अदानी वीज प्रकल्पाने नवीन ओळख दिली. त्यामुळे तिरोडा शहराचा परिसर झपाट्याने विकसित होण्याच्या मार्गावर लागला आहे. तिरोड्यालगतच्या काचेवानी, बरबसपुरा, मेहंदीपूर या गावांचे पुनर्वसन करण्यात आल्यानंतर नव्या ठिकाणी त्या गावकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्याने हे गावकरीही खुश असल्याचे दिसून येते. याशिवाय अदानी फाऊंडेशनकडून या गावांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना विविध सोयीसुविधा मिळण्यासोबत अनेक नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पासाठी परप्रांतातून आलेल्या कर्मचारी व कामगार वर्गाच्या विविध गरजा भागविताना येथील नागरिकांना उत्पन्नाची नवी साधनं उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे परंपरागत शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे राहणीमान सुधारले आहे.केवळ वीज प्रकल्पच नाही तर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या नागझिरा-नवेगावच्या जंगलात भ्रमंतीसाठी येणाऱ्या राज्यातील आणि राज्याबाहेरील पर्यटकांसाठी जवळचे शहर तिरोडाच आहे. त्यामुळे येथे आता चांगल्या हॉटेलांची भर पडत असल्याचे अलिकडच्या काळात दिसून येत आहे. याशिवाय शॉपिंग मॉल, सुपर मार्केटसारखी संकल्पना येथे प्रत्यक्षात उतरत असल्यामुळे तिरोडा परि सरात पुढील दोन-तीन वर्षात आमूलाग्र बदल झाल्याचे चित्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिरोडा शहरापासून काही अंतरावर गोंदिया मार्गावर असलेल्या काचेवानीजवळ अदानी प्रकल्पाच्या कर्मचारी वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने या भागात आणखीच वर्दळ वाढली आहे. या वसाहतीत अत्याधुनिक सोई-सुविधांसह सुसज्ज रुग्णालय व इतर सुविधा असल्यामुळे त्याचा लाभ अनेकांना होणार आहे.