शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थस्थळांना शासकीय जागेचे हस्तांतरण होणार

By admin | Updated: October 29, 2015 00:13 IST

तीर्थस्थळ आणि जागृत देवस्थान हद्दीत शासकीय जागेचे हस्तांतरण झाले नसल्याने विकास प्रभावित ठरत आहे.

सर्वेक्षण सुरु : वन व महसूल विभागाची चमू दाखलरंजीत चिचखेडे चुल्हाड (सिहोरा) तीर्थस्थळ आणि जागृत देवस्थान हद्दीत शासकीय जागेचे हस्तांतरण झाले नसल्याने विकास प्रभावित ठरत आहे. विश्वस्त मंडळानी अशा जागेचे हस्तांतरणासाठी प्रस्ताव सादर केली आहे. या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आल्याने चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानाला अंदाजे १५ एकर जागेचे हस्तांतरण होणार असल्याची माहिती मिळाली आहे.भंडारा जिल्हयात अनेक तीर्थस्थळ आणि जागृत देवस्थान आहे. पंरतु या तिर्थस्थळाकडे अतिरिक्त जागेचे हस्तांतरण झाले नसल्याने विकास प्रभावित ठरत आहे. शासकीय निधी खर्च तथा प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करतांना दस्तऐवजांवर अतिक्रमणाची नोंद विकासाला आडकाठी ठरत आहे. यामुळे अनेक देवस्थानात मंजूर करण्यात आलेला निधी शासनाला परत करण्यात येत आहे. अतिरिक्त जागेचे हस्तांतरण झाले नसल्याने विश्वस्त मंडळांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तिर्थस्थळ आणि देवस्थान परिसरात असणारी अतिरिक्त जागा हस्तांतरण करण्यासाठी विश्वस्त मंडळानी शासनाला प्रस्ताव दिली आहेत. या प्रस्तावांना हिरवा कंदिल दाखविण्यासाठी वन आणि महसुल विभागाच्या संयुक्त चमुने सर्वेक्षण सुरु केले आहे. जिल्हाभरात तालुका स्तरावर अशा चमु मार्फत सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. तुमसर तालुक्यात अशा चमु मार्फत चांदपुर, घुटेरा आणि पाथरी गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे. २००५ पुर्वीचे तिर्थस्थळ आणि देवस्थान शेजारी असणारे अतिक्रमण तथा जागा हस्तांतरणाची मागणी करणारे प्रस्ताव विचारात घेण्यात येत आहे. चांदपुरच्या जागृत हनुमान देवस्थान परिसरात जागेचा अभाव असल्याने विकास करताना विश्वस्त मंडळाना कसरत करावी लागत आहे. या देवस्थानाला यात्रा उत्सव आणि प्रसस्त इमारत बांधकामासाठी १५ एकर जागेची गरज आहे. या जागेच्या हस्तांतरणासाठी शासन स्तरावर प्रस्ताव देण्यात आले आहे. बहुतांश जागा वन विभागाच्या हद्दीतील असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही.दरम्यान नुकतेच वन आणि महसुल विभागाने या प्रस्तावाला अनुसरुन देवस्थान परिसरात जागा हस्तांतरणाचे सर्वेक्षण केले आहे. यामुळे विश्वस्त मंडळाचे आशा पल्लवित झालेल्या आहेत. येत्या १५ दिवसात शासन स्तरावर जागा हस्तांतरणावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.