तक्रार झाली अन् तासाभरात स्वतःला संपवलं! पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये रुग्णवाहिका चालकाचे टोकाचे पाऊल

By अंकुश गुंडावार | Updated: February 16, 2026 22:53 IST2026-02-16T22:53:33+5:302026-02-16T22:53:33+5:30

गोंदियात तेलंगणातील एका रुग्णवाहिका चालकाने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली.

Tragedy in Police Premises Ambulance Driver Takes Extreme Step in Gondia Police Station Parking | तक्रार झाली अन् तासाभरात स्वतःला संपवलं! पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये रुग्णवाहिका चालकाचे टोकाचे पाऊल

तक्रार झाली अन् तासाभरात स्वतःला संपवलं! पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये रुग्णवाहिका चालकाचे टोकाचे पाऊल

गोंदियाः जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार  पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात तेलंगणा राज्यातील एका रुग्णवाहिका चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. शिवा असे या चालकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवा हा खाजगी रुग्णवाहिकेतून तेलंगणा राज्यातून एक मृतदेह घेऊन नातेवाईकांसह त्यांच्या गावी जात होता. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आल्यानंतर चालक शिवाने मद्यप्राशन केल्यामुळे मृताच्या नातेवाईकांसोबत त्याचा वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेत टाकून पुढील प्रवासासाठी रवाना केला. तर मूळ रुग्णवाहिका आणि चालक शिवा यांना चौकशीसाठी डूग्गीपार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.

दरम्यान, आज सकाळी पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाच्या मागील बाजूस दोरीच्या साहाय्याने शिवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी वाहन अडविल्यामुळे व झालेल्या कारवाईच्या तणावातून शिवाने आत्महत्या केली की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. तपासाअंती आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Web Title : शिकायत दर्ज होने के बाद एम्बुलेंस चालक ने पुलिस स्टेशन पार्किंग में की आत्महत्या!

Web Summary : शराब पीकर गाड़ी चलाने की शिकायत के बाद तेलंगाना के एक एम्बुलेंस चालक को गोंदिया पुलिस स्टेशन में रोका गया। बाद में चालक पार्किंग क्षेत्र में आत्महत्या करते हुए मृत पाया गया। कारण निर्धारित करने के लिए जांच चल रही है।

Web Title : Complaint Filed, Ambulance Driver Ends Life in Police Station Parking!

Web Summary : Following a complaint about drunk driving, an ambulance driver from Telangana was held at a Gondia police station. The driver was later found dead, having committed suicide in the parking area. An investigation is underway to determine the cause.