शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने चालविला हरभरा पिकावर ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादीत केलेल्या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करता येत नसल्याने तो तसाच जागेवर खराब होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर तो फेकून देण्याची वेळ येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांने मागणी नसल्याने दोन क्विंटलपेक्षा अधिक वांगी फेकून दिली होती.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : लागवड खर्च निघणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : यंदा रब्बी हंगामात अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने याचा सर्वाधिक फटका गहू, हरभरा या पिकांना बसला. अवकाळी पावसामुुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पिके नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील डोंगरगाव खजरी येथील प्रल्हाद कोरे या शेतकऱ्यांने आपल्या पाच एकरातील हरभऱ्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याचा प्रकार सोमवारी (दि.६) उघडकीस आला.कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादीत केलेल्या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करता येत नसल्याने तो तसाच जागेवर खराब होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर तो फेकून देण्याची वेळ येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांने मागणी नसल्याने दोन क्विंटलपेक्षा अधिक वांगी फेकून दिली होती. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराई राहत असल्याने या कालावधीत वांग्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे मागील पंधरा दिवसांपासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. परिणामी अनेक नियोजित विवाह सोहळे सुध्दा रद्द करण्यात आले आहे. तर शेतमालाची वाहतूक करण्यासाठी साधने मिळत नसल्याने आणि ग्राहकांची मागणी कमी झाली असल्याने या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. त्यातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर यंदा सातत्याने नैसर्गिक संकट कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.दर आठ दिवसांनी अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या पिकांची शेती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे तालुक्यातील डोंगरगाव खजरी येथील प्रल्हाद कोरे या शेतकऱ्यांने आपल्या पाच एकरमधील हरभरा पिकांवर सोमवारी ट्रॅक्टरने नांगर फिरविला. कोरे यांनी पाच एकरमध्ये हरभरा पिकाची लागवड करण्यासाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च केले. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पूर्ण पाच एकरातील हरभरा पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्यानेच त्यांनी पाच एकरातील हरभरा पिकावर नांगर फिरविल्याचे सांगितले.कोरे यांच्याप्रमाणेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची हीच स्थिती असून शासनाने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.