आधी भाव नसल्याने टोमॅटो फेकले; आता ५० रुपयांवर गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:11+5:30

रक्त जाळून घेतलेले पीक फेकून देताना शेतकरी चांगलाच हळहळला होता. मात्र आता तोच टोमॅटो त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा ठरत आहे. कधी रस्त्यावर टाकला गेलेला टोमॅटो आता ६०-८० रुपये दराने विकला जात आहे. सध्या देशात महागाई सत्र सुरू असून सर्वच वस्तूंचे दर वधारले आहे. त्यात आता जेवणात हमखास वापर होणारा टोमॅटो चढल्याने ते वापरताना जरा जपून असा धसकाच गृहिणींनी घेतला आहे. 

Tomatoes thrown away because there was no price before; Now it has gone up to Rs 50! | आधी भाव नसल्याने टोमॅटो फेकले; आता ५० रुपयांवर गेले!

आधी भाव नसल्याने टोमॅटो फेकले; आता ५० रुपयांवर गेले!

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  साधारण दोन महिन्यांपूर्वी चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला होता. उत्पादन घेतल्यानंतर परवडणारा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागले होते. 
रक्त जाळून घेतलेले पीक फेकून देताना शेतकरी चांगलाच हळहळला होता. मात्र आता तोच टोमॅटो त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा ठरत आहे. कधी रस्त्यावर टाकला गेलेला टोमॅटो आता ६०-८० रुपये दराने विकला जात आहे. 
सध्या देशात महागाई सत्र सुरू असून सर्वच वस्तूंचे दर वधारले आहे. त्यात आता जेवणात हमखास वापर होणारा टोमॅटो चढल्याने ते वापरताना जरा जपून असा धसकाच गृहिणींनी घेतला आहे. 
रोजच्या जेवणातील वापर असो की, कोशिंबिरीतील वापर मात्र टोमॅटो चढल्याने आता त्याचा वापर डोळ्यात पाणी आणणारा ठरत आहे. भाजीपाला महागल्याने टोमॅटोची चटणीच करता येत होती. मात्र आता एवढा महाग टोमॅटो खरेदी करताना विचार करावा लागत असून चटणीही हिरावली आहे. 

येथून येतो टोमॅटो 
- गोंदिया जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन होत नसल्याने परराज्य व जिल्ह्यातून जिल्ह्यात टोमॅटोची आवक होत आहे. 
- जिल्ह्यात सध्या जयपूर, नाशिक बँगलोर येथून टोमॅटो येत असून तोही हलक्या दर्जाचा येते, अशी माहिती आहे. 
- स्थानिक शेतकरी भाजीपाला अन्य पीक घेत असल्याने व टोमॅटोला पोषक वातावरण येथे नसल्याने टोमॅटो शेती करता येत नाही. 
मागणी वाढली आवक घटली 
- एकतर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन होत नसून परराज्य व जिल्ह्यातून टोमॅटो आणला जातो. त्यातही हलक्या दर्जाचा माल येत असल्याने असून परतीच्या पावसाने पिकांचे चांगलेच नुकसान केले आहे. त्यात आता मागणी वाढली असून आवक घडल्याने टोमॅटोचे दर चांगलेच चढले आहे. 

एवढा महाग टोमॅटो  कसा परवडेल? 
किराणा समान व भाजीपाला चांगलाच महागला आहे. त्यात आता दररोजच्या वापरातील टोमॅटोही वधारल्याने एवढा महाग टोमॅटो खरेदी करताना विचारच पडतो. दररोज आता जेवणात एवढा महागडा टोमॅटो वापरणे सर्वसामान्यांना कसे परवडेल. 
- नेहा निनावे
महागडा भाजीपाला खरेदी न करता कधी-कधी टोमॅटोच्या चटणीची जोड देता येते. मात्र आता टोमॅटोच डोळे दाखवू लागला आहे. अशात दररोजच्या स्वयंपाकात टोमॅटो टाकणेच कठीण झाले आहे. टोमॅटो खरेदी करताना विचारच पडतो. 
- चित्रा लिल्हारे

 

Web Title: Tomatoes thrown away because there was no price before; Now it has gone up to Rs 50!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app