विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार, नखे व दात गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 01:03 PM2022-01-13T13:03:14+5:302022-01-13T14:41:16+5:30

नवेगावबांध तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत रामघाट बीटात वाघाची शिकार करुन त्याचे अवयव गायब केल्याची घटना समोर आली आहे.

tiger poaching with electric shock, Nails and teeth missing | विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार, नखे व दात गायब

विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार, नखे व दात गायब

googlenewsNext
ठळक मुद्दे रामघाट बीटातील घटना वन विभागात खळबळ

गोंदिया : विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार करुन त्याचे अवयव गायब केल्याची घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामघाट बीटातील कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये घडली. या प्रकारामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट बीट कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये वन कर्मचारी व वन मजूर गुरुवारी सकाळी गस्त घालण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना बीट क्रमांक २५४ बीमध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळला. त्यांनी याची माहिती लगेच उपवनसंरक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांच्यासह वन विभागाचे अधिकारी आणि मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे, सावन बहेकार हे घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावरील मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा जबडा व नखे गायब आहे. तसेच या वाघाची दोन दिवसांपूर्वीच शिकार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्युत शाॅक लावून या वाघाची शिकार करण्यात आली असावी अंदाज घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वर्तवला असून पंचनामा करण्यात आला आले. वाघाचे श्वविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होवू शकेल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाघाचे वय चार वर्ष

वाघाचे वय चार वर्ष असून तो नवेगावबांध-नागझिरा अभयारण्यातील नसून बाहेरुन या परिसरात आल्याची माहिती आहे. वन व वन्यजीव विभागाने या परिसरातील वाघाचे पायाचे ठसे मॅच करून पाहिले असता ते जुळले नसल्याने हा वाघ बाहेरुन आल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

शिकाऱ्यांची टोळी सक्रीय?

जिल्ह्यात मागील तीन चार महिन्याच्या कालावधीत विद्युत शॉक वनप्राण्यांची शिकार केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यातच रामघाट परिसरात आढळलेल्या वाघाची शिकार सुध्दा विद्युत शॉक देऊन करण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच वाघाचे अवयव गायब असल्याने त्याची यासाठीच शिकार केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title: tiger poaching with electric shock, Nails and teeth missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.