Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 00:03 IST2026-04-11T00:00:00+5:302026-04-11T00:03:21+5:30
Tiger Attack News: एका सहा वर्षाच्या मुलाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील आदर्श धाबेटेकडी येथे ही घटना घडली आहे.

Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
गोंदिया : घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकावर वाघाने झडप घातली. त्याला फरफटत नेत ठार केले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे आज (१० एप्रिल) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
प्रज्वल गोवर्धन मेश्राम (वय ६ वर्षे) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.
प्रज्वल हा घराजवळ खेळत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. वाघाने क्षणार्धात प्रज्वलला उचलून जंगलाच्या दिशेने ओढत नेले.
दरम्यान, कुटुंबीय व गावकऱ्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र, या भीषण हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून, परिसरात भीतीचे सावट वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.