शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपीला तीन वर्षाची शिक्षा

By admin | Updated: April 2, 2015 01:11 IST

दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाचा खून करण्यात आला.

गोंदिया : दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाचा खून करण्यात आला. ही घटना रचलेला कट नसल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात कलम ३०४ अन्वये दोघांना तीन वर्षाची शिक्षा तर दोघांना निर्दोष सोडले आहे. तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी येथील चौघांनी १३ आॅक्टोंबर २००८ च्या रात्री ८.३० वाजता दरम्यान लहू धनू मेश्राम (४५) या इसमाचा खून केला. लहू हा त्या दिवशी आपल्या घरी अंगणात मासेय्या भाजत असताना आरोपी रमेश शेंडे हा त्याच्या घरी आला. त्यावेळी लहुचा पुतण्या अनिल मेश्राम याच्या सोबत दारू पाजली नाही म्हणून बाचाबाची करू लागला. अनिलच्या मदातीसाठी काशिराम मेश्राम आले असताना आरोपी रमेश, सोमा, कुंजीलाल व कन्हैयालाल शेंडे या चौघांनी काशिरामला धक्काबुक्की केली. काशिरामच्या डोक्यावर काठीने मारल्यावर त्यांचा वाद सोडविण्यासाठी लहू गेला. लहूला सोमा व रमेशने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. लहूचा प्रथमोपचार तिरोडाच्या उपजिल्हा रूग्णालयात केल्यानंतर पुढच्या उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३०७, ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु परिस्थीतीचे अवलोकन केल्यावर त्याला मारण्यासाठी हा कट नसल्याने कलम ३०२ ला कलम ३०४ मध्ये बदलवून या प्रकरणातील आरोपी रमेश शेंडे व सोमा शेंडे या दोघांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली. कलम ३०४ अन्वये ३ वर्षाची शिक्षा व प्रत्येकाला पाच हजार रूपये दंड, कलम ३२४ नुसार २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सदर सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गीरटकर यांनी केली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅण्ड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काम केले. (तालुका प्रतिनिधी)