शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३५९ जण निगराणीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

बाहेरील देशातून कामानिमित्त देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तर जिल्हास्तरावर सुध्दा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे.

ठळक मुद्देविदेशातून परतणाऱ्यांची संख्या ७३ : तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर कोरोनामुळे विदेशात वास्तव्यास असणारे अनेकजण स्वगृही परत आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२०) विदेशातून एकूण ७३ जण परतले आहेत. यासर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या संर्पकात आलेल्या २८६ अशा ३५९ जणांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे सर्वजण प्रशासनाच्या निगरानीखाली आहेत.बाहेरील देशातून कामानिमित्त देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तर जिल्हास्तरावर सुध्दा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे. विदेशातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांची नोंदणी केली जात आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. विदेशात असलेले ७३ जण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात परतले आहेत. आतापर्यंत कोरोनासारखी तिघांना लक्षणे वाटत होती.त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. परंतु त्या तिघांचे नमुने निगेटिव्ह आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकही संशयीत किंवा रूग्ण नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस