शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नोटीसला न जुमानणाऱ्यांची आता थेट तुरुंगात रवानगी ! नवीन कायद्यानुसार प्रतिबंधक कारवाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 19:23 IST

Gondia : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांचे एक पाऊल पुढे आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना तडीपार व अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएसारख्या कारवाया केल्या गेल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांचे एक पाऊल पुढे आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना तडीपार व अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएसारख्या कारवाया केल्या गेल्या. पोलिसांनी प्रतिबंधक कारवायांत गुन्हेगाराला नोटीस पाठविल्यावर त्या नोटीसला प्रतिसाद दिला जात नव्हता. त्यामुळे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी नोटीसला न जुमानणाऱ्या गुन्हेगारांना सरळ आता तुरुंगवारी घडविण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे.

नवीन कायद्याची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत सहा गुन्हेगारांना तुरुगात पाठविले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. गुन्ह्यांचा तपास करण्याची गती झपाट्याने वाढविल्याने उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची टक्केवारी ७० ते ८० च्या घरात आहे. 

जिल्ह्यातील आणखी गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई सुरूच आहे. जिल्हा पोलिस दलातील सर्व पोलिस ठाणेदार याशिवाय स्थानिक गुन्हे शाखा, नेमलेली विशेष पथके यांच्याकडून दररोज गस्त, छापा, धडक कारवाई करून अवैध व्यवसायाला लगाम लावला जात आहे. पेट्रोलिंगच्या माध्यमातून सुद्धा अजून करडी नजर ठेवून अवैध व्यवसाय समोर आल्यास थेट कारवाई होणार आहे. अवैध व्यवसाय सुरू राहू नयेत, यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध दारू विक्री, जुगार अशा प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र पोलिस कायदा, शिवाय दारूबंदी आणि जुगारसोबतच विविध ठिकाणी पाहिजे असलेले गुन्हेगार, फरार आरोपी अशा सर्व जणांवर योग्य त्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत.

१६७ जणांचे अंतरिम बंदपत्र केले रद्द

अंतरिम बंदपत्राचा भंग केल्यामुळे कलम १२६ अंतर्गत ७४ जणांवर तर कलम १२९ अंतर्गत २३ जणांचा बंदपत्र रद्द करून त्यांच्याकडून ८ लाख १० हजार रुपये वसुल करून शासन जमा केले आहे.

२२७१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र पोलिस कायदा, शिवाय दारूबंदी आणि जुगारसोबतच विविध ठिकाणी पाहिजे असलेले गुन्हेगार, फरार आरोपी अशा २२७१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात कलम १२६ अंतर्गत १७६४ जणांवर तर कलम १२९ अंतर्गत ५०७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

१८५१ जणांनी जणांनी घेतले होते बंदपत्र

गोंदिया जिल्ह्यातील १८५१ गुन्हेगारांनी बंदपत्र घेतले होते. त्या बंदपत्रचा भंग करणाऱ्यांना दंड आकारण्यात आला आहे.

"गुन्हेगारांच्या प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी व समाजात शांतता व सुव्यवस्था नांदविण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार केले. प्रतिबंधक कारवाईत आधी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे पेशी असायची परंतु बीएसएननुसार आता पोलिस अधीक्षकांकडे पेशी लावली जाते. नोटीस बाजवूनही हजर न झालेल्या सहा जणांना तुरुंगात पाठविले आहे."- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक, गोंदिया.

English
हिंदी सारांश
Web Title : Gondia Police to Jail Notice Defaulters: New Preventive Actions

Web Summary : Gondia police are cracking down on criminals, jailing those ignoring notices. Superintendent Bhamre initiated this action under new laws. Six have already been jailed. Increased police patrols and crackdowns target illegal activities, ensuring public safety. Numerous preventive actions and fines have been imposed.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी