शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कोडेलोहारातून हलली ‘त्या’ विदेशी ठगांची सूत्रे

By admin | Updated: November 1, 2015 02:14 IST

दुबई व कुवैत देशात नोकरी लावणे व नकली पारपत्र (विजा) बनवून अनेकांना लाखो रुपयांनी ढगविण्याच्या ....

एकाला अटक : खात्यात आढळले ९० लाखवडेगाव : दुबई व कुवैत देशात नोकरी लावणे व नकली पारपत्र (विजा) बनवून अनेकांना लाखो रुपयांनी ढगविण्याच्या प्रकरणाची संपूर्ण सुत्रे तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा येथून हलल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान सदर प्रकरणातील एका आरोपीस शुक्रवारी (दि.३०) अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचे नाव अरुणसिंह वल्द विरेंद्रसिंग (३१) रा. मडाळ पो.ससापूर ता. गोला जि.गोरखपूर (उत्तर प्रदेश) असे आहे. त्याच्या बँक खात्यात सुमारे ९० लाख रुपये आढळल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजकुमार सुकुल साहानी (३३) (उत्तर प्रदेश) अद्याप फरार आहे. अटक झालेल्या आरोपीस मुंबई सीएसटी येथील त्याच्या ई-ट्रस्ट नावाच्या कार्यालयातून ठाणे पोलिसांनी अटक केली. दि.३० रोजी त्यास तिरोडा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. सदर आरोपीने ढगलेल्या युवकांची मुलाखत घेतल्याचे वृत्त आहे. या प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार राजकुमार साहानी याने संपूर्ण सूत्रे कोडेलोहारा येथून हलविल्याचे उघडकीस आले आहे. कोडेलोहारा येथील रहिवासी गंगेश्वर पृथ्वीराज पटले (२३) हा युवक जुलै २०१५ ला रोजगारासाठी जगशेदपूर येथे गेला असता त्याची आरोपी राजकुमारसोबत भेट झाली. त्यावेळी राजकुमारने गंगेश्वरला मदत केली. पुढे त्याच भेटीतून दोघांची जवळीक साधली. सप्टेंबरपासून दोन महिने आरोपी गंगेश्वर पटले याच्या घरीच थांबला. तेथे राहून त्याने वडेगाव परिसरातील बहुतांश गावे पिंजून काढली व सुमारे १५० युवकांना आपल्या फास्यात अडकविले.दरम्यान, आरोपीने तिरोडा येथील लॅबमधून युवकांची शारीरिक तपासणी, बिर्सी येथून एक्सरे काढले तर कॅफेतून रंगीत झेरॉक्स काढून त्याने बोगस पारपत्र, एअरवेज व एअर इंडियाच्या विमानाची बोगस तिकीटे व बोगस करारपत्र तयार केले. विमान तिकीटे दिली. त्यानंतर आपल्या नियोजित कार्यक्रमात फेरबदल करीत त्यांना २७, २८ व २९ आॅक्टोबरची तिकिटे दिली. आॅक्टोबर महिन्यात त्याने कोडेलोहारा हे स्थळ सोडत आपला मुक्काम बिर्सी येथील एका हॉटेलमध्ये हलविण्याचे वृत्त आहे. दरम्यान तिरोडा पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत असून यात आणखी काय समोर येते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.