‘त्या’ २७ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचे धडे

By Admin | Updated: February 4, 2016 02:01 IST2016-02-04T02:01:42+5:302016-02-04T02:01:42+5:30

भटकंती करीत कुटुंबाचा गाडा रेटणाऱ्या चितौड समाजातील २७ विद्यार्थ्यांवर येथील शहीद जान्या-तिम्या ....

'Those' 27 lessons learned from out-of-school children | ‘त्या’ २७ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचे धडे

‘त्या’ २७ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचे धडे

हजेरीपटावर नाव नोंदणी : भटकंती करणारी मुले शिक्षणाच्या प्रवाहात
गोरेगाव : भटकंती करीत कुटुंबाचा गाडा रेटणाऱ्या चितौड समाजातील २७ विद्यार्थ्यांवर येथील शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव, प्राथमिक शाळा गोरेगाव येथे शिक्षणाचे धडे गिरविले जात आहे.
यातील १७ विद्यार्थी शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे घेत आहेत. यात पाचव्या वर्गात चार विद्यार्थी, सहाव्या वर्गात सहा व सातव्या वर्गात सात विद्यार्थी अशी वयानुसार विभागणी या विद्यार्थ्यांची करण्यात आली आहे. तर बाकीचे नऊ विद्यार्थी प्राथमिक शाळा गोरेगाव येथे शिक्षण घेत आहेत.
शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे शासन निर्देश आहे. कुणीही प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, या निर्देशांना हेरुन येथील विषयतज्ज्ञांनी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. विशेष म्हणजे शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषदे हायस्कूलचे प्राचार्य संजय आकरे यांनी ‘त्या’ २७ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आधार कार्ड बनविण्यासाठी येथील तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी माहिती दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'Those' 27 lessons learned from out-of-school children