शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सलग तिसऱ्या दिवशी सहा जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 5:00 AM

सलग तिसऱ्या दिवशी सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसात एकूण ३८ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात केवळ २९ कोरोना बाधीत रुग्ण आहे.

ठळक मुद्देएका नवीन रुग्णांची भर : जिल्ह्यात आता २९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असली तरी कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे. रविवारी (दि.३१) सलग तिसऱ्या दिवशी सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसात एकूण ३८ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात केवळ २९ कोरोना बाधीत रुग्ण आहे.३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे रोजी कोरानाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. रविवारी जिल्ह्यात पुन्हा एका कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली. हा रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता ६७ वर पोहचला आहे. मात्र यापैकी आतापर्यंत ३८ कोरोना बाधीत कोरानामुक्त झाले असल्याने जिल्ह्यात सध्या २९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. आत्तापर्यंत आढळलेले सर्व कोरोना बाधीत रुग्ण हे ग्रामीण भागातील असून त्यांना मुंबई, पुणे आणि दिल्ली येथून प्रवास करुन आल्याची हिस्ट्री आहे. ग्रामीण भागातील रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने ही चिंतेची बाब आहे. मात्र कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही थोडी दिलासादायक बाब आहे. रविवारी येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमधील ६ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच त्यांचे समुदेशन करुन त्यांना सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर आणि परिचारिकांनी पुष्पगुच्छ देऊन व टाळ्या वाजवून निरोप दिला.तो रुग्ण देवरी नव्हे झारखंडमधील४शनिवारी देवरी येथे एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला होता. मात्र हा रुग्ण देवरी येथील नसून तो झारखंड राज्यातील आहे. देवरी तालुक्यातील मुरदोली घाटात आठ दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तो जखमी झाला होता. देवरी ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला गोंदिया येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविले असता त्याचा रिपोर्ट शनिवारी (दि.३०) कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या स्थितीत देवरी तालुक्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसून नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे तहसीलदार विजय बोरुडे यांनी सांगितले.

८८३ जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह४कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ९९७ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ८८३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. ४७ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. रविवारी गोंदिया तालुक्यात एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ झाली असून ही संख्या आता २३ वर पोहचली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या