चोरट्यांनी केले पुन्हा ग्रामपंचायतीना टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:15+5:30

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं.मध्ये चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आठवडाभरात एकाच रात्रीला चार ठिकाणी चोऱ्या झाल्या.

Thieves again target Gram Panchayats | चोरट्यांनी केले पुन्हा ग्रामपंचायतीना टार्गेट

चोरट्यांनी केले पुन्हा ग्रामपंचायतीना टार्गेट

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच रात्री चार ठिकाणी चोरी : आठवडाभरातील दुसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : गाव सीमेच्या टोकावर असलेल्या ग्रामपंचायतींना चोरट्यांनी टार्गेट केले आहे. बुधवारी (दि.११) रात्री तालुक्यातील इटखेडा, जानवा व कोरंभी या ग्रामपंचायतमध्ये तसेच कोरंभीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चोरी झाली. आठवड्यातील ग्रामपंचायतमधील चोरींची संख्या पाच झाली आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनात दहशत निर्माण झाली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं.मध्ये चोरी झाली होती.
या चोरीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आठवडाभरात एकाच रात्रीला चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. यात कोरंभी, इटखेडा व जानवा या तीन ग्रामपंचायतींचा तर कोरंभी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे. जानवा येथील ग्रा.पं.चोरीची तक्र ार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली नाही.चोरट्यांनी सर्वच ठिकाणी संगणक व प्रिंटर याप्रकारचेच साहित्य लंपास केले आहेत.
या चोरीच्या प्रकरणात सुमारे ३१ हजार रु पयांचे साहित्य चोरट्यांनी पळविले.४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं.मध्ये चोरी झाल्यानंतर गोंदिया येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र तो मार्ग दाखवू शकला नव्हता.गुरु वारी परत इटखेडा व कोरंभी येथे श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. संगणक व त्यासंबंधीत साहित्यालाच चोरट्यांनी लक्ष बनवले आहे. या चोऱ्यांचा उलगडा करण्यात अद्यापतरी पोलिसांना यश आले नाही.

वरिष्ठांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष
चोºयांचे सत्र सुरू असतांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी ग्रामसेवकांना खबरदारीचे उपाय म्हणून निर्देश दिले होते. मात्र या निर्देशांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे चोºयांचे सत्र सुरूच आहे. शक्य असल्यास १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्याच्या सूचना होत्या.मात्र एकाही ग्रामपंचायतीत लावण्यात आले नाहीत.त्यामुळे चोरीचा उलगडा होण्यास मदत मिळत नाही.
 

Web Title: Thieves again target Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.