शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात झाले ४५ कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यात दररोज वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येनुसार कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढत चालली असून, रविवारपर्यंतची स्थिती बघता जिल्ह्यात ४५ ...

गोंदिया : जिल्ह्यात दररोज वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येनुसार कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढत चालली असून, रविवारपर्यंतची स्थिती बघता जिल्ह्यात ४५ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सडक-अर्जुनी तालुका आघाडीवर असून, तेथे सर्वाधिक १४ झोन तयार करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर गोंदिया तालुका असून, येथे ११ झोन तयार करण्यात आले आहेत. या संपूर्ण कंटेन्मेंट झोनमध्ये ७३५ रुग्णांचा समावेश आहे.

रविवारपर्यंतची आकडेवारी बघता जिल्ह्यात ३,११५ क्रियाशील रुग्ण होते. यातील २,३२४ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात असून त्यांच्याकडून असलेल्या चुकांमुळे अन्य लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. अशात घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्या इतरांना धोका उद्‌भवू नये यासाठी कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात आता ४५ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १४ कंटेन्मेंट झोन सडक-अर्जुनी तालुक्यात आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर गोंदिया तालुका असून, येथे ११ झोन आहेत. या एकूण ४५ कंटेन्मेंट झोनमध्ये ७३५ रुग्ण असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.

------------------------------------

ग्रामीण भागात कोरोनाचा कहर

जिल्ह्यात कोरोना कहर करीत असून, गोंदिया शहरासह तालुका कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. मात्र एवढ्यावरच कोरोना थांबला नाही, ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत आता कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. अशात आता नागरिकांनी स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

--------------------------------

कंटेन्मेंट झोनचा तालुकानिहाय तक्ता

तालुका झोनची संख्या रुग्णसंख्या

गोंदिया ११ १९९

तिरोडा ०१ १७

गोरेगाव ०२ १६

आमगाव ०९ १५३

सालेकसा ०४ ५९

सडक-अर्जुनी १४ २०८

अर्जुनी-मोरगाव ०२ ४४

देवरी ०२ ३९

एकूण ४५ ७३५