अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 03:41 IST2025-05-12T03:40:35+5:302025-05-12T03:41:11+5:30

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

there is no proposal to merge the two nationalist parties yet said praful patel | अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

लोकमत न्यूज नेटवर्क, गोंदिया :राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रीकरणाचा अद्याप कुठलाच प्रस्ताव आलेला नाही. याची केवळ माध्यमातच चर्चा आहे, तसेच यावर मी व्यक्तिगत माझे विचार मांडणे योग्य नाही. आम्ही पक्षातील सर्व प्रमुख मंडळी चर्चा करू. त्या चर्चेत काही निघाले, तरच त्यावर काही बोलणे योग्य होईल. त्यापूर्वी यावर काहीही बोलण्याची गरज नसल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. 

खा. पटेल हे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी संवाद साधला. उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारने युद्धापासून माघार का घेतली आणि शस्त्रसंधी का स्वीकारली, असा सवाल उपस्थित केला. यावर खा. पटेल म्हणाले, देशाचा फायदा कुठल्या बाबतीत आहे, हे ज्यांना माहीत नसेल,  अशांच्या बाष्कळ बडबडीला उत्तर देणे योग्य वाटत नाही. भारताला पहलगाम हल्ल्याला उत्तर देणे गरजेचे होते, असेही खा. पटेल याप्रसंगी बोलताना म्हणाले. 

 

Web Title: there is no proposal to merge the two nationalist parties yet said praful patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.