शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात होतेय ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

गोंदियाच्या बाजारपेठेची दूरवर ख्याती आहे. म्हणूनच जिल्हाच काय लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदीसाठी येते. त्यात आता दिवाळी फक्त दोनच दिवसांवर आली आहे. अशात दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात जाम गर्दी वाढली आहे. हीच बाब हेरून व्यापारीही सकाळी लवकरच दुकान उघडत असून रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ खुली आहे.

ठळक मुद्देवाहतूक व्यवस्थेचे नियोजन नाही : वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळी आता जेम-तेम दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत आता बाजारात वर्दळ दिसून येत आहे. अशात मात्र वाहतूक शाखेकडून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी पावला-पावलांवर ट्राफीक जाम होत आहे. परिणामी नागरिक चांगलेच त्रासले आहेत.गोंदियाच्या बाजारपेठेची दूरवर ख्याती आहे. म्हणूनच जिल्हाच काय लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदीसाठी येते. त्यात आता दिवाळी फक्त दोनच दिवसांवर आली आहे. अशात दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात जाम गर्दी वाढली आहे. हीच बाब हेरून व्यापारीही सकाळी लवकरच दुकान उघडत असून रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ खुली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ चांगलीच गजबजून गेली आहे. अशात मात्र वाढत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून काहीच नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसते.दिवाळीची गर्दी बघता वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियोजन केले जात होते. यात चारचाकींची पार्कींग, चारचाकींना बाजारात प्रवेश बंदी, दुचाकींची पार्कींग, ठिकठिकाणी बेरीकेड्स लावून वाहतूक व्यवस्था केली जात होती. यंदा मात्र तसे काहीच दिसून येत नाही. बाजारात जास्त प्रमाणात नागरिक दुचाकीनेच येणे पसंत करतात. त्यामुळे दुचाकींची गर्दी जास्त असते. अशात मात्र एखादी चारचाकी बाजारात शिरली की ट्राफीक जाम होत असून नागरिकांना अडकून पडावे लागते. नेमकी हीच समस्या आता बाजारात पावला-पावलांवर दिसून येत आहे. चारचाकी सर्रास शिरत असल्याने शिवाय रस्त्यांवर वाहन उभी केली जात असल्याने ट्राफिक जाम होत आहे.हॉर्नच्या आवाजाने डोकेदुखीवेळोवेळी होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक अडकून पडतात. त्यात वाहनांची गर्दी वाढते. अशात काही जास्त घाई असणारे सतत हॉर्न वाजवून आपली घाई दाखवून देतात. अशात मात्र गर्दीतील अन्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. सध्या हाच प्रकार बाजारात बघावयास मिळत आहे. मात्र वाहतूक पोलीस दिसून येत नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMarketबाजार