प्रतीक्षा संपली ! इटियाडोह प्रकल्प ओव्हर फ्लो; शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर

By अंकुश गुंडावार | Published: September 21, 2023 12:05 PM2023-09-21T12:05:59+5:302023-09-21T12:08:05+5:30

नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा

The wait is over! Etiadoh project overflow, farmers' irrigation problem solved | प्रतीक्षा संपली ! इटियाडोह प्रकल्प ओव्हर फ्लो; शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर

प्रतीक्षा संपली ! इटियाडोह प्रकल्प ओव्हर फ्लो; शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर

googlenewsNext

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महत्वपुर्ण असलेला इटियाडोह प्रकल्प गुरुवारी (दि.२१) सकाळी ओव्हर फ्लो झाल्याने मागील आठवडाभरापासून प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याची प्रतीक्षा अखेर संपली. हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर झाली आहे.

पावसाळा संपत येत असताना यंदा इटियाडोह प्रकल्प ओव्हर फ्लो झाला नव्हता. तर मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे या प्रकल्पातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहचला होता. तर पावसाचा जोर कायम राहिल्या हा प्रकल्प केव्हाही ओव्हर फ्लो होण्याची शक्यता वर्तविली होती. अखेर गुरुवारी (दि.२१) पहाटे ६ वाजता हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याची लागून असलेली प्रतीक्षा संपली.

हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने नदी काठावरील गावांना व नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्तकतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये तसेच शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये, जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

आजची जलाशय पातळी : २५५.६० मी.

आजचा उपयुक्त पाणीसाठा : ३१७.८७ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : १०० टक्के

Web Title: The wait is over! Etiadoh project overflow, farmers' irrigation problem solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.