गोंदिया : मध्यप्रदेश महाराष्ट्र-छत्तीसगड झोनचे पूर्वाश्रमीचे प्रवक्ते विकास उर्फ अनंत नागपुरे यांच्यासह १४ स्त्री व पुरुष नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. या नक्षलवाद्यांची कायदेशिर आत्मसमर्पणाची प्रक्रिया शुक्रवारी (दि.१७) जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्या उपस्थित पार पडली.
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी १५ पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांचा कायदेशीररित्या समर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,सहायक आयुक्त गुप्तवार्ता औटी, पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, नक्षल कक्षाचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आत्मसमर्पित नलक्षवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सनदशीर मार्गाची कास समर्पित नक्षलवाद्यांनी धरावी असे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी सांगितले. केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने समर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ सुविधा पुरविण्यात येईल, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हास्तरीय पडताळणी समितीसमोर आत्मसमर्पणाचे प्रमाणपत्र बहाल
गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या १५ नलक्षवाद्यांना जिल्हास्तरीय पडताळणी समितीच्या समोर आत्मसमर्पणाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून पुनर्वसन झालेल्या समर्पित नक्षलवाद्याना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक भामरे यांनी यावेळी सांगितले. समर्पित नक्षलवाद्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कौशल्य विकास प्रशिक्षण देणार
येत्या काळात समर्पित नक्षलवाद्यांच्या कुटुंबाशी संवाद साधण्याची संधी दिली जाईल. यासह आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांसाठी असलेल्या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या पुनर्वसन योजनेचा पूर्ण लाभ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामील केले जाईल या अंतर्गत जमीन शिक्षण कौशल्य प्रशिक्षण असे अनेक लाभ त्यांना दिले जाणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये यांचा समावेश
अनंत ऊर्फ विकास उर्फ नवज्योत नागपूरे, ऊर्फ विनोद भास्कर रामास्वामी रा. बिडीडी चाळ वरळी मुबंई, वय ४० वर्ष, रा. चिंताखुटा, जि. करीमनगर, तेलंगना, नागसु ऊर्फ गोलू उर्फ पांडु पुसू वडे, वय ३५ वर्षे, रा. तिरलागड, पो.स्टे.बांधे, जि. कांकेर, छ.ग., रानो ऊर्फ रम्मी ऊर्फ रामे येशु नरोटे, वय ३० वर्षे रा. पेठा, एओपी हालेवारा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, तिजाऊराम, संतु ऊर्फ धरमसाय पोरेटी वय ३५ कमेटी, वर्ष, रा. पाटनवाढवी, कॅम्प पाटन, ता. मोहला, जि. राजनांदगाव, छ.ग. संगिता ऊर्फ शेवंती रायसिंग पंधरे, वय ३२ वर्षे, रा. रुपझर, कॅम्प बैहर, ता. बिरसा, जि. बालाघाट, म.प्र, अनुजा ऊर्फ नक्के सुकलू कारा, वय ५५ वर्षे, रा. डूंगरी परनाला, बस्तर, ता. बैरुगली, छ.ग., पूजा ऊर्फ जुगनी ऊर्फ सन्नु मुडियम, बय २७ वर्षे, रा. दल्ला. ता. उच्चुर, जि. बिजापुर, छ.ग., दिनेश ऊर्फ सादु पूलाई सोटी, वय ३० वर्ष, रा. चिमेलू, जंगरगुंडा, जि. सुकमा, छ.ग., रामको/शिला चमरु मडावी (मधुची पत्नी), वय ४० वर्ष, रा. कटेझरी, धानोरा, जि. गडचिरोली, अर्जुन ऊर्फ रितु भिमा दोड्डी, वय २० वर्षे, रा. गुट्टोड, पो.स्टे बासलगुडा, जि. बिजापुर, छ.ग., प्रताप ऊर्फ समर ऊर्फ (सदस्य दर्रकसा एरिया काशीराम राजय्य बन्तुला, वय कमेटी) ६२ वर्षे, रा. सिगारावपेठ, पो.स्टे. रायकल, ता. जि. जगीतीयाल तेलंगणा आदींचा समावेश आहे.
Web Summary : 15 Naxalites, including a former spokesperson, surrendered to Gondia police. Their legal surrender was formalized in the presence of the District Collector. They were honored, and assured rehabilitation benefits from government schemes, including skill development, to help them rejoin mainstream society.
Web Summary : गोंदिया पुलिस के सामने एक पूर्व प्रवक्ता सहित 15 नक्सलियों ने आत्मसमर्पण किया। जिलाधिकारी की उपस्थिति में उनका कानूनी आत्मसमर्पण पूरा हुआ। उन्हें सम्मानित किया गया और कौशल विकास सहित सरकारी योजनाओं से पुनर्वास लाभ का आश्वासन दिया गया, ताकि उन्हें मुख्यधारा में शामिल होने में मदद मिल सके।