शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांच्या संख्येत झाली वाढ : गणनेत ३६ सारसांची नोंद

By नरेश रहिले | Updated: June 16, 2025 19:10 IST

Gondia : मागील वर्षाच्या तुलनेत १३ सारस वाढले

नरेश रहिले

गोंदिया : जिल्ह्याच्या नैसर्गिक संपदेत भर घालणाऱ्या सारसांच्या संख्येने यंदा सुखद धक्का दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल १३ सारस पक्ष्यांची वाढ झाली आहे. सारस संवर्धनासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न होत असल्याने सारस संवर्धन होत असल्याचेदिलासादायक चित्र आहे. यंदा झालेल्या सारस गणनेत गोंदिया वनपरिक्षेत्रात तब्बल ३६ सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे.

गोंदिया वनपरिक्षेत्रात सन २०२३ मध्ये सारसांची संख्या १२ होती. ती सन २०२४ मध्ये २३ झाली. गोंदिया वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक व त्यांच्या चमूने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे ही संख्या तब्बल ३६ पोहचली आहे. सोमवारी (दि.१६) पहाटे ५ ते सकाळी ९ वाजता दरम्यान सारस गणना करण्यात आली. यात जिल्ह्यातील ४० स्थळांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी २७ स्थळ हे गोंदिया वनपरिक्षेत्रातील आहेत. पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासाठी सातत्याने कार्यरत सेवा संस्था व वनविभागासोबत मिळून अन्य स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने सारस गणनेचे कार्य पारंपारिक आणि शास्त्रीय पद्धतीने केले. सारस पक्ष्यांच्या वावर असलेल्या ठिकाणावर सकाळी ५ ते ९ वाजतापर्यंत ही गणना करण्यात आली.

जिल्ह्यात ३९ सारसजिल्ह्यातील गोंदिया, आमगाव व तिरोडा या तीन तालुक्यातील ४० स्थळांचे निरीक्षण करण्यात आले. यात गोंदिया वनपरिक्षेत्रातील २७ ठिकाणी ३६ सारस, आमगाव तालुक्यातील ग्राम घाटटेमणी येथे ३ सारस असे ३९ सारस आढळले. तिरोडा तालुक्यात तीन स्थळांचे निरीक्षण करण्यात आले परंतु तेथे सारस आढळले नाहीत. 

६ शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजारांचे प्रोत्साहनज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारसने अंडी घातली त्या शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान होऊ नये यासाठी नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशनने दीड लाख रूपये देऊन शेतकऱ्यांना मदत केली. शेतकरी सारस पक्ष्यांचे संवर्धन करतील यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रूपये प्रोत्साहनपर देण्यात आले. मागील वर्षी ६ शेतकऱ्यांच्या शेतात सारसने अंडी घातली होती.

"सारस संरक्षणासाठी सारसचा अधिवास असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये म्हणून मज्जाव केला. सारस पक्ष्यांवर दूरुन नजर ठेवण्यासाठी मचान बांधले. सारसचा अधिवास असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी किटकनाशक फवारणी करू नये असे आवाहन केले. सारस संवर्धनासाठी वनविभागाला शेतकऱ्यांनी सहकार्य केले आहे. दोन वर्षापासून सुरू असलेल्या मेहनतीमुळेच सारस संवर्धन होऊ लागले आहे."- दिलीप कौशिक, वनपरिक्षेत्राधिकारी गोंदिया.

टॅग्स :gondiya-acगोंदिया