शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

घराघरांत दरवळू लागला मसाल्याचा सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 4:31 PM

मसाला खरेदीकडे गृहिणींचा कल : पावसाळ्याच्या आधीच तयार करतात मसाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा सुरू झाला की गृहिणी पापड, कुरडई बनविण्यासह खडा मसाला, मसाल्याचे पदार्थ, चटणी, मसाला बनविण्यासाठी लागणारे पदार्थ, कैरी, लिंबूचे लोणचे आदी कामांना लागतात. वर्षभराचा घरगुती मसाला याच दिवसांत तयार करून ठेवला जात असल्याने बाजारात मसाला खरेदीचे प्रमाण वाढल्याचे किराणा दुकानदार सांगत आहेत.

उन्हाळ्यात मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरची खरेदी करून तिला उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला, धने, बडीशेप आदी पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात. यंदा मिरचीचे भाव घसरल्याचे दिसत आहे. यामुळे गृहिणीकडून मसाल्यांच्या तयारीला वेग आला असून तिखट बनविणे सुरू करीत आहेत.

स्वयंपाक घरात दरवळला सुगंधमिरची, मिरची पूड, खडा मसाला या महत्त्वाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साधारणपणे मार्चमध्ये घराघरात तिखट बनवण्याची घाई सुरू होते. मिरची खरेदीपासून तिखटासाठी लागणाऱ्या पदार्थांच्या खरेदीची सुरुवात केली जाते. 

मसाल्याच्या गिरणीत बनविलेल्या मसाल्याने स्वयंपाकाला विशिष्ट चव येते, हे माहीत असल्याने हल्ली अनेक जण मोठ्या प्रमाणात मसाला बनवून नंतर त्याचे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटप करतात, असे महिला सांगतात. त्यामुळे मार्च अखेरपासूनच गृहिणींची मिरची व मसाला साहित्य खरेदी- साठीची लगबग सुरू झाली आहे.

असे आहेत मसाल्यातील वस्तूंचे दर

प्रकार                                   आता                            मागीलतेजपान                                   २००                                  २००कर्णफूल                                 ९६०                                १२००जायपत्री                                  २८००                             २४००जायफळ                                 ९६०                              १०००जिरे                                         ३६०                                ५५०धने                                          १८०                                 २००हळद                                      ३४०                                 १६०शहाजिरा                                 ९६०                                ८००दालचिनी                                 ४८०                                ४००काळेमिरे                                 ९६०                                ७००

उन्हाळ्यातच पापड, कैरीचे लोणचे तयार केले जाते. या दिवसांतच वेळ मिळतो. मसाला व कैरीचा हाच हंगाम असतो. मसालाच नाही तर सर्व प्रकारचे धान्य व अन्य साहित्य वर्षभरासाठी आताच घेऊन ठेवते. - सुजाता बहेकार, गृहिणी

वर्षभर मसाला साठवून ठेवण्यासाठी उन्हाळ्यातच त्याची खरेदी केली जाते. या दिवसात महिला मसाल्यासाठी लागणाऱ्या वस्तू, पदार्थ खरेदी करून घरी मसाला तयार करतात. परराज्यातून मिरची व अन्य मसाला आयात केला जातो. मिरची देखील याच दिवसांत चांगली मिळते. - बालचंद मुलचंदानी, विक्रेता

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFood recipes 2023पाककृती 2023