शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता व मोहफुल संकलनावरील बंदी उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

लॉकडाऊन काळात तेंदूपत्ता संकलन सुद्धा बंद करण्यात आले होते. यामुळे चार जिल्ह्यातील लाखो कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले होते. या बाबीची दखल घेत मुख्यमंत्राकडे बंदी उठविण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत मोहफुल व तेंदूपत्ता संकलनावरील बंदी उठविण्याचे आदेश काढले. त्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देगरीब कुटुंबाना दिलासा : ग्रामीण भागातील मजूर व गावकऱ्यांनी मानले शासनाचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता व मोहफुलाचे संकलन करण्यात येते. हे अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन काळात तेंदूपत्ता संकलन सुद्धा बंद करण्यात आले होते. यामुळे चार जिल्ह्यातील लाखो कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले होते.या बाबीची दखल घेत मुख्यमंत्राकडे बंदी उठविण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत मोहफुल व तेंदूपत्ता संकलनावरील बंदी उठविण्याचे आदेश काढले. त्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहुन लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला. त्यामुळे मागील २१ दिवसापासुन बंद असलेला मोहफुल आणि तेंदूपत्ता संकलन करण्याचा कामावर मोठे संकट निर्माण झाले. शेतशिवारात चालणारे हे दोन्ही कामे असतात. तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलनाचा हंगाम एकदा संपला की आपल्या हातुन सर्व काही निघून गेल्यासारखे असते. वनक्षेत्रात किंवा झाडी प्रदेशात राहणाºया लाखो कुटुंबांचा वर्षभराचा उदरनिर्वाह या दोन्हीच्या उत्पादन व संकलनावर अवलंबून असतो.अशात यावरील बंदी कायम राहिली तर रोजगार जाईल अशी चिंता त्यांना होती. ही बाब लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. विदर्भातील काही मंत्र्यांच्या सुद्धा ही बाब निदर्शनास आणून दिली होती. याचीच दखल घेत त्यांनी मोहफुुल व तेंदूपत्ता संकलनास परवानगी दिली आहे. बंदी उठविण्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांना पोहोचले आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक