तेंदूपत्ता व मोहफुल संकलनावरील बंदी उठविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:17+5:30
लॉकडाऊन काळात तेंदूपत्ता संकलन सुद्धा बंद करण्यात आले होते. यामुळे चार जिल्ह्यातील लाखो कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले होते. या बाबीची दखल घेत मुख्यमंत्राकडे बंदी उठविण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत मोहफुल व तेंदूपत्ता संकलनावरील बंदी उठविण्याचे आदेश काढले. त्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

तेंदूपत्ता व मोहफुल संकलनावरील बंदी उठविली
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता व मोहफुलाचे संकलन करण्यात येते. हे अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन काळात तेंदूपत्ता संकलन सुद्धा बंद करण्यात आले होते. यामुळे चार जिल्ह्यातील लाखो कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले होते.
या बाबीची दखल घेत मुख्यमंत्राकडे बंदी उठविण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत मोहफुल व तेंदूपत्ता संकलनावरील बंदी उठविण्याचे आदेश काढले. त्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहुन लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला. त्यामुळे मागील २१ दिवसापासुन बंद असलेला मोहफुल आणि तेंदूपत्ता संकलन करण्याचा कामावर मोठे संकट निर्माण झाले. शेतशिवारात चालणारे हे दोन्ही कामे असतात. तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलनाचा हंगाम एकदा संपला की आपल्या हातुन सर्व काही निघून गेल्यासारखे असते. वनक्षेत्रात किंवा झाडी प्रदेशात राहणाºया लाखो कुटुंबांचा वर्षभराचा उदरनिर्वाह या दोन्हीच्या उत्पादन व संकलनावर अवलंबून असतो.अशात यावरील बंदी कायम राहिली तर रोजगार जाईल अशी चिंता त्यांना होती. ही बाब लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. विदर्भातील काही मंत्र्यांच्या सुद्धा ही बाब निदर्शनास आणून दिली होती. याचीच दखल घेत त्यांनी मोहफुुल व तेंदूपत्ता संकलनास परवानगी दिली आहे. बंदी उठविण्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांना पोहोचले आहेत.