शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
4
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
5
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
6
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
7
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
8
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
9
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
10
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
11
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
12
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
13
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
14
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
15
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
16
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
17
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
18
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
19
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
20
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

युवा महोत्सवाची थाटात सांगता

By admin | Updated: December 6, 2014 22:51 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियाद्वारे दि. २ ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये शंकरलाल अग्रवाल डी.एड्. कॉलेज गोंदिया येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

गोंदिया : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियाद्वारे दि. २ ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये शंकरलाल अग्रवाल डी.एड्. कॉलेज गोंदिया येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
युवा महोत्सवाचे उद्घाटन डॉ.अंशु सैनी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शेख, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा तायक्वांडो असोसिएशन सचिव दुलीचंद मेश्राम होते.
या दोन दिवसीय युवा महोत्सवामध्ये शास्त्रीय गायन, भरत नाट्यम, तबला वादन, हार्मोनियम वादन, गिटार वादन, हिंदी एकांकिता, हिंदी वक्तृत्व स्पर्धा व लोकगीत या स्पर्धांचा समावेश होता. विविध स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्रा.चंदीवाले, प्रा. एस.एम. पारधी, प्रा. पारधी, प्रा. एच.आर. सहारे, प्रा. दाऊल बोंद्रे यांनी काम पाहिले. जिल्हास्तर युवा महोत्सवातील विजेते स्पर्धक नागपूर येथे विभागस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत.
विभागस्तरीय युवा महोत्सव दि. ६ डिसेंबर रोजी झाला. विभागस्तरीय युवा महोत्सवाकरीता पात्र ठरलेले स्पर्धक नारायण पिथोडे (तबला), निहारीका उजवणे (हिंदी (वकृत्व), आंचल बघेले (शास्त्रीय गायन), दिपेश सोनवणे (हार्मोनियम) एस.एस. गर्ल्स कॉलेज याचा संघ (लोकगीत) व स्व. शंकरलाल अग्रवाल डी.एड. कॉजेज यांचा संघ (हिंदी एकांकिका) इत्यादी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी केले. सुत्रसंचालन अनिल निमगडे, क्रीडा अधिकारी यांनी केले. आभार प्रदर्शन अरुण गंधी यांनी केले. कार्यक्रमासाठी बी.एम. चौधरी, क्रीडा मार्गदर्शक आर.जी. टेकाडे, सुनील पारधी यांनी सहकार्य केले .