शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शाळांवर सदस्यांचीच वक्रदृष्टी

By admin | Updated: February 1, 2016 01:42 IST

अखेरच्या घटका मोजत असलेल्या शाळांना एक जबाबदार सदस्याच्या नात्याने नवजीवन देण्याचे पवित्र कार्य करण्याचे सोडून ...

कपिल केकत गोंदियाअखेरच्या घटका मोजत असलेल्या शाळांना एक जबाबदार सदस्याच्या नात्याने नवजीवन देण्याचे पवित्र कार्य करण्याचे सोडून नगर परिषदेतील सदस्यांची या शाळांवरच वक्रदृष्टी दिसून येत आहे. कारण पालिकेतील सदस्यांनीच या शाळांतील काही वर्गखोल्या विविध कामांच्या प्रयोजनार्थ काही मंडळांना देण्याची मागणी केली आहे. यासाठी आमसभेत मांडण्यात आलेला प्रस्ताव पारित झाला आहे. या प्रकाराबाबत मात्र समाजमनातून रोष व्यक्त केला जात आहे. नगर परिषदेच्या आजघडीला १७ प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची स्थिती काही चांगली नाही. विद्यार्थ्यांअभावी पालिकेच्या या शाळा ओस पडल्या असून यातील काही शाळांचे समायोजन करण्याच्या विचारात खुद्द पालिका आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, पालिकेच्या या शाळा व महाविद्यालयांत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका खाजगी शाळेची संख्या असावी एवढी संख्या पालिकेच्या या शाळा व महाविद्यालयाची आहे. कोट्यवधींचा खर्च या शाळा व महाविद्यालयांवर नगर परिषद करीत आहे. मात्र पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्याने विद्यार्थी व पालक पालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यासाठी पालिका प्रशासन व शिक्षक हे दोघेही तेवढेच जबाबदार आहेत. पालिका प्रशासनाला शाळांना विद्यार्थ्यांनी भरून काढण्यासाठी काही वेगळे करावे यासाठी वेळ नाही. तर शिक्षकांचे फक्त पगारापुरतेच शाळांशी नाते असल्याचेही आता शहरवासी शाळांची गत बघून बोलू लागले आहेत. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे, पालिकेचे सदस्यही आता या शाळांच्या जीवावर उठले आहेत. त्याचे असे की, सदस्यांकडूनच शाळांतील वर्गखोल्या मंडळांना देण्याचे प्रस्ताव आमसभेत मांडण्यात आले आहे. कुणी गरजूंना रोजगार निर्मिती प्रशिक्षणासाठी तर कुणी क्रीडा मंडळांना वर्गखोल्या देण्याचा प्रस्ताव सभेत मांडला असून त्यावर ठराव घेण्यात आला आहे. आज एक-दोन वर्ग खोल्या देण्यात आल्या तर उद्या जाऊन अन्य कुणी आणखी खोल्यांची मागणी करणार. आज रित्या पडून असलेल्या या शाळा विद्यार्थ्यांनी भरून निघाव्या व त्यांचे गतवैभव परतून यावे यासाठी या जबाबदार सदस्यांच्या प्रयत्नांची गरज आहे. त्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच या शाळांचा कायापालट होणार यात शंका नाही. यासाठी तसे प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.