अश्लील चित्रफिती दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 21:02 IST2023-03-14T21:01:50+5:302023-03-14T21:02:33+5:30
Gondia News इयत्ता नवव्या वर्गातील विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षक मोबाइलमधील अश्लील चित्रफिती दाखवून लैंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आला आहे. दिवसेंदिवस घडणाऱ्या या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.

अश्लील चित्रफिती दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ
गोंदिया : इयत्ता नवव्या वर्गातील विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षक मोबाइलमधील अश्लील चित्रफिती दाखवून लैंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आला आहे. दिवसेंदिवस घडणाऱ्या या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात घडलेल्या या घटनेत हेमंतकुमार गुलाराम येरणे (३५, रा. इसापूर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायालयाने २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी हा पीडित विद्यार्थिनी व तिच्या मैत्रिणींसोबत आक्षेपार्ह वर्तन करायचा. कपडे ओढून आपल्या कक्षात बोलवायचा. एकांतात मोबाइलमध्ये अश्लील चित्रफिती दाखवायचा. लैंगिक छळ करून त्याची लैंगिक इच्छा असल्याचे पीडितेने स्थानिक पोलिस ठाण्यात बयान दिले. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
तीन दिवसांतील दुसरी घटना
तीन दिवसांपूर्वीच गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढत अश्लील चित्रफित दाखवित असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच आता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.