शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त ठरवू नये

By admin | Updated: October 3, 2014 01:51 IST

जिल्ह्यातील शाळांची कर्मचारी मान्यता सूची २०१३-१४ मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतरांनी अतिरिक्त ठरविण्यात येवू नये ..

गोंदिया : जिल्ह्यातील शाळांची कर्मचारी मान्यता सूची २०१३-१४ मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतरांनी अतिरिक्त ठरविण्यात येवू नये व त्याबाबतचे निर्णय त्वरित कळविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्य) यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनानुसार, सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाची सूची मान्यता त्यापुढील सन २०१४-१५ च्या प्रथम सत्राच्या सुलै महिन्याच्या शेवटी दिलेली आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सन २०१३-१४ व आजपर्यंतचे संपूर्ण वेतन अनुदान मान्यता सूची नसताना मंजूर करून देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे पद आपोआप मंजूर व नियमित झाले आहे. सदर व्यक्तींनी आपला कार्यभार पूर्ण केला आहे. खासगी मान्यता प्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन अनुदान मंजूर करताना केवळ मंजूर पदांचेच वेतन अनुदान मंजूर करण्यात येत असते. त्यामुळे आता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणे कायदेशिर ठरू शकत नाही, अशी धारणा सदर कर्मचाऱ्यांची आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात शाळांनी त्यांच्या स्तरावर अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतरांची यादी तयार करावी व आपल्याच स्तरावर समायोजन करावे, असे नमूद केले आहे. परंतु शिक्षक व शिक्षकेतरांना अतिरिक्त ठरविणे व त्यांचे समायोजन करण्याचे अधिकार महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार मुख्याध्यापक व संस्थाचालकांना नसून शिक्षण विभागास असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. त्यामुळे संदर्भित सूची मान्यता सन २०१३-१४ त्वरीत रद्द करण्यात यावी. सन २०१२-१३ चीच सूची मान्यता कायम ठेवून नवीन नियम, कायदा व धोरणांचा अवलंब सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा तसेच शिक्षण सेवकांसह कोणत्याही शिक्षक व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवू नये, अशी मागणी परिषदेने केली आहे.