शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोलणे चारशे वाहन चालकांना पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

मोबाईल आजघडीला अत्यावशक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाईलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाईलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.

ठळक मुद्देजीवावर बेतू शकतो प्रकार : वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे हे अत्यंत धोक्याचे असते. मोबाईलवर बोलताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यातील वाहन चालक वाहन चालवितांना मोबाईलवर बोलताना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यात ४०० वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे मोबाईलवर बोलणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडले.वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास अपघात होण्याची शक्यता जास्त असते हे वाहन चालकांना माहिती असतानाही मोठ्या प्रमाणात वाहन चालक वाहन चालवितांना मोबाईलवर बोलतात. यामुळे अपघात घडतात.मोबाईल आजघडीला अत्यावशक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाईलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाईलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवू नये किंवा वाहन चालवितांना कुणाचा फोन आला तरीही त्या फोनला उचलू नये असे वाहतूक नियम असताना वाहन चालक त्या नियमाला मोडून आपल्याच धुंदीत वाहन चालवित मोबाईलवर बोलून इतरांचा बळी घेतात.अशा हलगर्जीपणा करणाऱ्या वाहन चालकांना धडा शिकवावा म्हणून जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सन २०१९ यावर्षात जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाहन चालवितांना मोबाईलवर बोलताना ४०० वाहन चालकांना पकडून त्यांच्याकडून ८० हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोबाईलवर बोलताना आढळल्यास त्या वाहन चालकांकडून प्रत्येकी २०० रूपये दंड घेतला आहे.सर्वाधिक कारवाई डिसेंबर महिन्यातगोंदिया जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालक वाहन चालवितांना मोबाईलवर बोलून वाहतूक नियमाचे उलंघन करताना वर्षभरात प्रत्येक महिन्यात आढळले. परंतु डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कारवाई मोबाईलवर बोलणाºया वाहन चालकांची आहे.तब्बल १७७ वाहन चालक एकट्या डिसेंबर महिन्यात आढळले आहेत.त्यात जानेवारी महिन्यात ३, फेब्रुवारी महिन्यात ४,मार्च महिन्यात २, एप्रिल १०, मे २५, जून ५१, जुलै ३०, आॅगस्ट २२, सप्टेंबर ८, आॅक्टोबर ४ व नोव्हेंबर ६४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.वाहन चालविताना मोबाईचा वापर करू नये. वाहन चालविताना मोबाईलकडे नजरही टाकल्यास डोके मोबाईलमध्ये गुंतून जाते. परिणामी अपघात होते. दंडाच्या भीतीपोटी नाही तर सुरक्षितता म्हणून वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये.- दिनेश तायडे,पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMobileमोबाइल