लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले! अडीच हजार रूपयांची लाच घेतली; ग्राम चिखली येथे घेतले ताब्यात

By कपिल केकत | Published: October 19, 2023 07:49 PM2023-10-19T19:49:46+5:302023-10-19T19:50:07+5:30

जमिनीचा फेरफार करून देण्यासाठी अडीच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

Talathi was caught red-handed A bribe of two and a half thousand rupees was taken Taken into custody at village Chikhli | लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले! अडीच हजार रूपयांची लाच घेतली; ग्राम चिखली येथे घेतले ताब्यात

लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले! अडीच हजार रूपयांची लाच घेतली; ग्राम चिखली येथे घेतले ताब्यात

गोंदिया : जमिनीचा फेरफार करून देण्यासाठी अडीच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम चिखली येथील तलाठी कार्यालयात गुरूवारी (दि१९) ही कारवाई करण्यात आली. सुरेन मुन्ना मारगाये (३८,रा. अर्जुनी-मोरगाव) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार (२८,रा.नैनपूर, सडक-अर्जुनी) हे शेतकरी असून त्यांच्या वडिलांनी चिखली तलाठी कार्यालय अंतर्गत ग्राम नैनपूर शिवारात सर्वे क्रमांक ३३२ व ३३३ मधील ०.३४ व ०.५४ हे. आर शेती तक्रारदार व त्यांच्या वहिनींच्या नावे बक्षीस पत्र करून दिली आहे. बक्षीस पत्राची दुय्यम निबंधक कार्यालयात २६ सप्टेंबर रोजी नोंदणी करण्यात आली आहे. तक्रारदाराने बक्षिसपत्राची नोंदणी प्रत व फेरफाराबाबतचा अर्ज ३ ऑक्टोबर रोजी तलाठी कार्यालयात देउन फेरफार करून देण्याची विनंती केली. यावर सुरेन मारगाये याने काम करून देण्यासाठी त्यांना तीन हजार रूपयांची मागणी केली.

तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि.१९) चिखली येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला. यात आरोपी सुरेन मारगाये याने तीन हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती अडीच हजार रूपयांची लाच स्वीकारली. यावर पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विलास काळे, पोनी अतुल तवाड़े, पोनि.उमाकांत उगले, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश कहालकर, नापोशि संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी पार पाडली.

Web Title: Talathi was caught red-handed A bribe of two and a half thousand rupees was taken Taken into custody at village Chikhli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.