शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी व कोतवालची मागणी

By admin | Updated: September 15, 2014 00:14 IST

तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या तलाठी साजा- १८ ग्राम धादरी येथे मागील एक वर्षापूर्वी तलाठी मेश्राम यांचे स्थानांतर तिरोडा येथे करण्यात आले आहे. अतिरिक्त पदभार असलेले

इंदोरा बुज.: तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या तलाठी साजा- १८ ग्राम धादरी येथे मागील एक वर्षापूर्वी तलाठी मेश्राम यांचे स्थानांतर तिरोडा येथे करण्यात आले आहे. अतिरिक्त पदभार असलेले तलाठी केवळ आठवड्यातून दोनच दिवस येत असल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठीच समस्या निर्माण होत आहे. बदली झालेले तलाठी मेश्राम यांच्या जागी सरांडी साज्याचे तलाठी नागदेवे यांना अतिरिक्त कारभार सोपविण्यात आले. साजा- १८ धादरीमध्ये पाच गावांचा समावेश आहे. या साज्यासाठी अतिरिक्त तलाठी नागदेवे आठवड्यात फक्त दोन दिवस येतात. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना तलाठ्याअभावी फार त्रास सहन करावा लागतो. तलाठी हा शेतकऱ्यांचा जवळचा मित्र म्हणावा लागेल. परंतु शेतकऱ्यांना दररोज तलाठ्यांशी काम पडतो तेव्हा तलाठी वेळेवर हजर राहत नाही. त्यांची चातकासारखी वाट पहावी लागते. जेव्हा तलाठी येतो तेव्हा काही शेतकरी आपल्या दुसऱ्या कामात व्यस्त राहतात. त्यामुळे त्यांची भेट होत नाही. वेळेवर कुठलेच काम होत नाही. विद्यार्थ्यांनासुद्धा शालेय कामासाठी लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांची वाट पहावी लागते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे काम होत नाही. त्यामुळे साजा-१८ धादरीला कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तिरोडा यांना केली आहे.धादरी-उमरी गावात कोतवालाचे पदसुद्धा रिक्त आहे. मागील १० वर्षांपूर्वी या गावातील कोतवाल सेवानिवृत्त झाले होते. तेव्हापासून या गावाला कोतवाल देण्यात आले नाही. कोतवालाअभावी शासनाची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. तलाठी व कोतवाल नसल्याने हे गाव राजस्व विभागापासून फार दूर गेले आहे. तहसीलदारामार्फत कोतवाल पदाची भरती करण्यात आली. मात्र या साजा-१८ साठी कोतवालाचे पद भरतीपासून मुक्त ठेवण्यात आले. तालुकास्तरावर कोतवाल भरती करूनसुद्धा धादरी गावाला १० वर्षापासून कोतवाल देण्यात आले नाही. तेव्हा धादरी, उमरी, सालेबर्डी, खुरखुडी व सोनाली या पाच गावांसाठी तलाठी व कोतवालाची स्थाई नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)