शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामींविरोधात कडक कारवाई करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

गोंदिया : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थी दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्‌सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी ...

गोंदिया : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थी दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्‌सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामींना घटनेच्या ३ दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून अर्णब गोस्वामींवर कडक कारवाई करा अशी मागणी जिल्हा कॉँग्रेस कमिटीने केली असून यासाठी शुक्रवारी (दि.२२) आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

या व्हॉट्‌सॲप चॅटवरून अर्णब गोस्वामी यांचे पंतप्रधान व गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी अर्णब यांना नियमाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे स्पष्ट आहे. त्यासोबतच पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे, तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजप निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का? याचे उतरही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्णब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकमात्र अर्णब गोस्वामीच दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करुन गोस्वामीचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हासुद्धा राष्ट्रद्रोहाचाच भाग असून या प्रकरणात गोस्वामीला मदत करणाऱ्या उच्चपदस्थांवरदेखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी जिल्हा कॉँग्रेस कमिटीने शुक्रवारी (दि.२२) धरणे आंदोलनातून केली. याप्रकरणी दोषीवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवदेन देण्यात आले आहे.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ.एन.डी. किरसान, सचिव विनोद जैन, सचिव अमर वऱ्हाडे, सूर्यप्रकाश भगत, जहीर अहमद, पी.जी.कोरे, अनिलकुमार गौतम, अशोक गुप्ता, योगेश अग्रवाल, निकेश मिश्रा, प्रभा उपराडे, देवका वरखडे, चमनलाल बिसेन, पप्पू पटले, गंगाराम बावणकर, श्याम गणवीर, रणजीत गणवीेर, आशिष नागपुरे, बलपीतसिंग बग्गा, राजेंद्र डहाट, नीलम हलमारे, अमर राहुल, शैलेश जायस्वाल, आनंद लांजेवार, सुशील खरवडे आदींचा समावेश होता.