शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठीही ‘समर ट्रेनिंग’

By admin | Updated: May 3, 2017 00:54 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात असतानाच आता त्यांना परिपूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग

सर्व शिक्षा अभियानाचा उपक्रम : शीघ्र हस्तक्षेप व कौशल्य विकास कार्यक्रम कपिल केकत   गोंदिया दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात असतानाच आता त्यांना परिपूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘समर ट्रेनिंग’ दिले जाणार आहे. उन्हाळ््याच्या सुट्ट्यात दिव्यांगासाठी शिघ्रहस्तक्षेप व कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन १ मे पासून करण्यात आले आहे. शिक्षण हा सर्वांचा अधिकार असून यापासून दिव्यांगही सुटू नये यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांना शिक्षणाची दारे मोकळी करण्यात आली आहेत. या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी कौशल्य विकसीत करणारे विविध कार्यक्रम व प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून आज दिव्यांग असले तरी हे विद्यार्थी पुढे कुणावर अवलंबून राहू नये, हा यामागचा हेतू असतो. यामुळेच अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपंग समावेशित कार्यक्रम वरदान ठरत आहे. आता उन्हाळ््याच्या सुट्ट्या लागल्या असून या सुट्ट्यांचा योग्य तो वापर व्हावा या उद्देशातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘समर ट्रेनिंग’चे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील मुलांकरिता शिघ्रहस्तक्षेप कार्यक्रम, जे विद्यार्थी वर्ग पहिलीमध्ये या सत्रात दाखल होणार आहेत व दुसरीमध्ये गेलेल्या दिव्यांग मुलांकरिता शाळा पूर्वतयारी कार्यक्रम तर वर्ग ९ ते १२ पर्यंतच्या मुलांकरिता किमान कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन तालुकास्तरावर १ मे ते २० जून पर्यंत करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत फाईल, पायपोस, खडू, रांगोळी, गुलदस्ते, अगरबत्ती, टेबल क्लॉथ, क्राफ्ट, फिश पॉट तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिव्यांग मुलांना स्वयंरोजगाराकरिता मदत व्हावी व शिक्षणानंतर स्वत:चा किरकोळ व्यवसाय टाकता यावा या उद्देशातून हा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो. याची संपूर्ण जबाबदारी समन्वयक विजय ठोकणे सांभाळत आहेत. ३४५ मुलांचा सहभाग या कार्यक्रमात ० ते ५ वयोगटातील ११७ मुले शिघ्रहस्तक्षेप, वर्ग १ ते २ मधील १११ मुले शाळा पूर्वतयारी तर वर्ग ९ ते १२ पर्यंतची ११७ मुले किमान कौशल्य विकास कार्यक्रमात भाग घेणार आहेत. यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यरत दोन जिल्हा समन्वयक, १५ तालुका समन्यवक व ४२ विशेष शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये सडक अर्जुनी तालुक्यातून ४९, तिरोडा तालुक्यातून २९, आमगाव तालुक्यातून ४१, सालेकसा तालुक्यातून ३६, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून २९, देवरी तालुक्यातून ७७, गोंदिया तालुक्यातून ५० व गोरेगाव तालुक्यातून ३४ मुले सहभागी होणार आहेत. अपंगत्वाची ओळख लवकर झाल्यास योग्य ती उपाययोजना करून त्यावर मात करता येते किंवा त्याची तीव्रता कमी करण्यास मदत होते. याकरिता शिघ्रहस्तक्षेप कार्यक्रमातून पुढील दोन महिन्यांत हे काम केले जाणार आहे. ज्यांना कायमचे अपंगत्व आले आहे अशा वर्ग ९ ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. - उल्हास नरड शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. गोंदिया