शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उन्हाळी धानपिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:29 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकºयांचे हित व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी तालुक्यात उन्हाळी धानपीक लावण्याची परवानगी द्यावी,...

ठळक मुद्देसंघटनेची मागणी : शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी तालुक्यात उन्हाळी धानपीक लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी धान उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीला घेऊन सोमवारी संघटनेच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदनही देण्यात आले.जिल्ह्यात अपुºया पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रात रोवणी प्रक्रि याही होऊ शकली नाही. गेल्या ४ दशकांत पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे. शासनाकडून जिल्हा दुष्काळग्रस्त करण्याची अपेक्षा असताना अद्यापही ती पूर्ण होऊ शकली नाही. केवळ तीन तालुक्यांत अल्पशा दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अर्जुनी-मोर तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे तालुक्यात असलेल्या उपलब्ध जलसाठ्यातून शेतकऱ्यांना उन्हाळी धान पीक दिल्यास निश्चितच खरीप हंगामाचे नुकसान भरून निघण्यास मोठी मदत होणार आहे.दरवर्षी तालुक्यात १० हजार ५९० हेक्टर कृषी क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड होत असते. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून शहराकडे पलायन करण्याची आवश्यकताही राहत नाही. तालुक्यात ७० ग्रामपंचायत व एक नगरपंचायत मिळून १६० गावे व वाड्या आहेत. यामुळे १०८ गावांमध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व २५ गावांमध्ये सोलर पंपांच्या योजना कार्यान्वित आहेत. धानपिकाला ७५० मिमी पावसाची गरज असताना यंदा तालुक्यात ९५९ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची प्रशासनाकडे आकडेवारी आहे.विभागीय भूजल सर्वेक्षणानुसार तालुक्यातील भूजल पातळीही समाधानकारक आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार २२ नोव्हेंबर रोजी अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार व १७ नोव्हेंबर रोजी खंडविकास अधिकारी यांनी पत्र पाठवून तालुक्यात उन्हाळी धान पीक घेण्यास मज्जाव केला. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाहीर नोटीसही लावण्यात आले आहेत. त्यामुळे जलसाठा उपलब्ध असूनही शेतकरी द्विधा मनिस्थतीत आहेत. जिल्हाधिकाºयांनी याकडे विशेष लक्ष देवून तातडीने शेतकºयांना उन्हाळी धान पीक लावण्यास परवानगी द्यावी अन्यथा संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी धान उत्पादक शेतकरी संघटनेद्वारे करण्यात आली आहे.मागणीसाठी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सेवानिवृत्त कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुुरामकर, किशोर तरोणे, बन्सीलाल लंजे, लोकपाल गहाणे, ललित बाळबुद्धे, अश्विन नाकाडे, देवा लंजे, गोपीनाथ लंजे, कवडू गाडेगोणे, लक्ष्मण सोनवाने, महादेव रामटेके, मोहन झोडे, लेकराम कापगते, शालीकराम नाकाडे यांच्यासह मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.