शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा

By admin | Updated: December 16, 2015 02:04 IST

आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सत्याच्या कसोटीवर उतरणे अति गरजेचे आहे.

धोटे : चमत्कारांवर विश्वास ठेवू नकाबोंडगावदेवी : आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सत्याच्या कसोटीवर उतरणे अति गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातील कोणत्याही घटनेला कारण असते. त्या कारणाचा शोध घेवून सत्य ओळखण्याची जिज्ञासा अंगी बाळगावे. अज्ञानामुळे काही गोष्टी नकळत घडत असतात. त्याचे दुष्परिणाम म्हणून समाजात जादूटोणा, भानामती, अंगामध्ये देवी संचरणे, यासारख्या विचित्र व चमत्कारिक घटनांवर समाजमन विश्वास ठेवतो. अशा अपप्रवृत्तींच्या बाबींनी आपण अधोगतीकडे वाटचाल करतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांनी व्यक्त केले. चान्नाबाक्टी येथील मिलिंद विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त प्राचार्य मधू रामटेके होते. अतिथी म्हणून अर्जुनी-मोरगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप भानसे, प्राचार्य लता मेश्राम, प्रा. गिरिश बोरकर, हेमंत राजगिरे, आर.डब्ल्यू. बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. धोटे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी भानामती, भूतबाधा या भ्रामक कल्पनांवर कदापी विश्वास ठेवू नये. अंधश्रद्धेच्या आहारी जावू नये, असे सांगत त्यांनी अंधश्रद्धांवर कडाडून प्रहार केला. डॉ. प्रदीप भानसे म्हणाले, भारतीय संविधानातील ५१ (क) कलमाचा आधार घेऊन मूलभूत कर्तव्याविषयी विद्यार्थ्यांनी जागृत राहणे आवश्यक आहे. अंगामध्ये जिद्द, चिकाटी ठेवूनच ध्येयाच्या शिखरापर्यंत मजल गाठणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले. सर्वप्रथम संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्ज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. संचालन जयेश भोवते यांनी केले. आभार प्रा. तारक माटे यांनी मानले. (वार्ताहर)