शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

धडपड करणारा सदैव जिंकतो

By admin | Updated: January 28, 2015 23:36 IST

ज्यांना यश आले नसेल त्यांनी भविष्याकरिता प्रयत्न करावे आपल्याला निश्चितच त्याचे फळ मिळेल. कारण धडपड करणारा हा सदैव जिंकतो असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

काचेवानी : ज्यांना यश आले नसेल त्यांनी भविष्याकरिता प्रयत्न करावे आपल्याला निश्चितच त्याचे फळ मिळेल. कारण धडपड करणारा हा सदैव जिंकतो असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले. तिरोडा तालुक्याच्या करटी (बु.) केंद्रांतर्गत ग्राम बेरडीपार (काचे.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित तालुका क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चतुर्भूज बिसेन होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती बंडू सोनवाने, प्रभू पटले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बंसोड, माजी उपसभापती वसंत भगत, सरपंच प्रकाश ठाकरे, सरपंच गायत्री चौधरी, सुरेश झगेकार, सुखदेव बिसेन, धनराज पटले, जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार उपस्थित होते. प्रास्ताविक स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे तालुका सचिव के.आर.रहांगडाले यांनी मांडले. यावेळी चतुर्भूज बिसेन, प्रल्हाद जांभूळकर, राजलक्ष्मी तुरकर यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, शालेय मुलांच्या खेळात किंवा कार्यक्रमात राजकारण आणणे योग्य नसल्याची टिका केली. कार्यक्रमात पक्ष व राजकारण तसेच शिक्षकांवर दडपण आणून कार्य करणे योग्य नसल्याचे सांगीतले. त्यांनी बौध्दीक विकासासोबतच सर्वांगिण विकासात भर पडावी तसेच आरोग्य उत्तम रहावे याकरिता खेळ आवश्यक असल्याचे मत मांडले. दरम्यान त्यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये माध्यमिक मुलांची कबड्डी भजेपार शाळा प्रथम, गुलाबटोला व्दितीय तर प्राथमिक विभागातून प्रथम बेरडीपार (काचेवानी) व व्दितीय मारेगाव शाळेने पुरस्कार पटकाविला. मुलींमध्ये माध्यमिक विभागाचा प्रथम क्रमांक गुमाधावडा, व्दितीय मरारटोला तर प्राथमिक विभागातून प्रथम क्रमांक गोंडमोहाडी व व्दितीय क्रमांक गुलाबटोला शाळेने पटकाविला. खो-खो मध्ये माध्यमिक मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सोनेगाव तर व्दितीय क्रमांक इंदोरा शाळेने तसेच प्राथमिक विभागामध्ये प्रथम क्रमांक अत्री तर व्दितीय क्रमांक गांगला शाळेने पटकाविला. मुलीच्या स्पर्धेत माध्यमिक विभागातून प्रथम जमुनिया, व्दितीय क्रमांक खडकी शाळेने तर प्राथमिक विभागातून प्रथम क्रमांक अर्जुनी तर व्दितीय क्रमांक बेरडीपार (काचेवानी) शाळेने पटकाविला. सांस्कृतिक कार्यक्रमात माध्यमिक विभागातून डोंगरगाव (प्रथम), परसवाडा (व्दितीय), तसेच प्राथमिक विभागातून डोंगरगाव (प्रथम), नत्थुटोली (व्दितीय) आणि प्रेक्षणीय कवायतीत माध्यमिक स्तरावर बिरसी (प्रथम), बेरडीपार (व्दितीय) तसेच प्राथमिक स्तरातून कवलेवाडा (प्रथम), बिहीरीया (व्दितीय) मानकरी ठरल्या. (वार्ताहर)