शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह रूग्णामुळे सिलेझरीत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण तालुक्यातील अन्य मित्रांसबोत कामानिमित्त काही महिन्यांपूर्वी मुंबईला गेला होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तो आपल्या मित्रांसह मुंबई ग्रीन कॉटन येथून १५ मे रोजी गावात आला. गावात येताच तो घरी गेला व आई-वडिलांसोबत राहू लागला.

ठळक मुद्देअख्खे गाव दहशतीत : गावात उडाला विलगीकरणाचा फज्जा, संबंधिताचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळील ग्राम सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण कोरोना बाधित आढळून आल्याने अख्ख्या गावात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. मुंबईहून आलेला तो तरूण संस्थात्मक विलगीकरणात न राहता गृह अलगीकरणात राहत होता अशी माहिती आहे. घरात असताना परिसरात अनेकांशी त्याचा संपर्क आल्याची माहिती गावातून हाती लागली. गावातील एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या अट्टाहासापायी सिलेझरी येथील संस्थात्मक विलगीकरणाचा फज्जा उडाल्याची गावात चर्चा आहे. गुरूवारी (दि.२८) रात्री त्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ माजली.सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण तालुक्यातील अन्य मित्रांसबोत कामानिमित्त काही महिन्यांपूर्वी मुंबईला गेला होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तो आपल्या मित्रांसह मुंबई ग्रीन कॉटन येथून १५ मे रोजी गावात आला. गावात येताच तो घरी गेला व आई-वडिलांसोबत राहू लागला. त्याला गावातील संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले नाही अशी गावातून माहिती मिळाली. १५ मे पासून घराजवळील परिसरात व सार्वजनिक बैठकीवर सुद्धा त्याचे बसणे-उठणे सुरू होते. सदर युवक गडचिरोली आणि गोंदिया येथील कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आले असल्याचे कळल्याने त्याला अर्जुनी-मोरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी (दि.२७) दाखल करण्यात करून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी अहवाल गुरूवारी रात्री उशीरा प्राप्त झाला व त्यात तो कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाल्याने गावासह परिसरात कमालीची खळबळ माजून अख्खा परिसर दहशतीखाली दिसत आहे.प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीतसिलेझरीत रूग्ण निघताच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वानुसार उपविभागीय अधिकारी सिल्पा सोनाले यांनी परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत केला. कोअर झोनमध्ये सिलेझरी गावाचा समावेश करण्यात आला. तसेच गावाजवळील विहिरगाव, येरंडी, घुसोबाटोला, डोंगरगावचा बफर झोनमध्ये समावेश करून दोन्ही झोन मधील गावे कंटोनमेंट क्षेत्रात टाकले. सदर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना सदर क्षेत्रात येण्यास पुर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे.

त्या लोकप्रतिनिधीचा अट्टाहास नडलासिलेझरी येथील एका लोकप्रतिनिधीच्या अट्टाहासापायी संस्थात्मक क्वारंटाईनचा फज्जा उडाल्याची गावात खमंग चर्चा आहे. गावातील जिल्हा परि,द वरिष्ठ प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते व बाहेरून आलेले येथेच राहत होते. अशातच गावातील एका राजकीय पक्षाचे नेते समजणारे तसेच लोकप्रतिनिधीचे जवाबदार पद सांभाळणाऱ्या महाशयाची दोन मुले, एक सुन, एक नात शहरातून ८ मे रोजी गावात आले. आम्ही सर्व तपासन्या करून आलो आम्ही बाधित नाही असा अट्टाहास करून शाळेतील विलगीकरण कक्षात न राहता गावात मध्यभागी असलेल्या घरी ते राहु लागले. ते स्वत:च्या घरात राहू शकतात तर आम्ही का? नाही असे बोलून काहींनी घर गाठले व येथूनच गावात क्वारंटाईनचा फज्जा उडाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

अनेकांच्या संपर्काततो तरूण अनेकांच्या संपर्कात आल्याची ओरड गावात आहे. आई-वडिलांसोबत एकाच घरात राहत असल्याने त्यांचा संबंध नित्यनेम आला. आई रोहयो कामावर सुद्धा जात होती. तर वडील कामानिमित्त परिसरातील एका गावात सातत्याने जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या