शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जिंकलंस भावा! एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या युवकाच्या हाती आले रेल्वेचे स्टेयरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 08:50 IST

Gondia News आलेल्या संकटाचा बाऊ न करता आपल्या ध्येयासाठी मोलमजुरी करणाऱ्या युवकाच्या हातात आता रेल्वेचे स्टेअरिंग आले आहे.

ठळक मुद्देबादल गजभियेने ठेवला युवा पिढीसमोर आदर्शखडतर प्रवासानंतर मिळाले यश

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्याजवळ काही नाही असे समजून निराश होऊन परिस्थितीसमोर हात टेकण्यापेक्षा ओढवलेल्या परिस्थितीशी दोन हात करणे केव्हाही चांगले असते. यात अपयश आले तरी चालेल, पण प्रयत्न करणे सोडून न देता जो परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतो तो निश्चितच जीवनात यशस्वी होतो. आलेल्या संकटाचा बाऊ न करता आपल्या ध्येयासाठी मोलमजुरी करणाऱ्या युवकाच्या हातात आता रेल्वेचे स्टेअरिंग आले आहे. (The steering wheel of the railway came into the hands of a young man who was once a mercenary)बादल बालकदास गजभिये, रा. आसोली, ता. गोंदिया असे त्या युवकाचे नाव आहे. २०१३ ला त्याच्यावरील आईचं छत्र हरपलं. वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले होते. अत्यंत विपरीत परिस्थितीत बुद्धविहारात अभ्यास करून त्याने स्पर्धा परीक्षा पास केली. दोन वर्षांपूर्वी लोको पायलटच्या मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव आलं आणि आता तो तीन महिन्यांपूर्वी नोकरीवर रुजू झाला.कॅन्सरग्रस्त बादलची आई तो बारावीला असतानाच मरण पावली. लहानगा विशाल (बादलचा लहान भाऊ) केवळ सातव्या इयत्तेत शिकत होता. आईची कॅन्सरशी झुंज, आपल्या पश्चात आपल्या मुलांचं काय होईल ही आईच्या डोळ्यातली काळजी. औषधाला पैसे नव्हते. सरिता (बादलची बहीण) डी.एड.ला होती. आईला रोज बाराशे रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन लागायचं. यासाठी तिने मोलमजुरी केली. लोकांच्या घरची धुणी-भांडी केली. आपल्या दोन भावंडांना जगविण्यासाठी आणि आईच्या औषध पाण्यासाठी आईला कसेही करून वाचवता यावा म्हणून सरिता रोज मजुरी करू लागली. ती त्या दोन्ही भावंडांची आई झाली.स्वत:च्या गरजा मारून, पोटाला चिमटा घेऊन भावंडांची ती माय झाली. तिच्या मेहनतीला भावांनी साथ दिली. आईच्या छत्रछायेत हे तिन्ही भावंडे जगत होती; पण नियतीला ते पाहवले नाही. त्यांची आई कॅन्सरने गेली. मात्र संकटे हात धुवून मागे लागली होती. त्यांचं राहतं घर पाडलं गेलं. गावातील शिक्षकांनी या भावंडांना ज्येष्ठ कार्यकर्त्या सविता बेदरकर यांच्याकडे पाठविले. त्यांनी या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत शक्य तेवढी मदत केली. पोरांनी सुद्धा परिस्थितीची जाणीव ठेवत मेहनतीचं चीज केलं.पुस्तके हेच आपले नातेवाईकगरिबाला कोणी नातेवाईक नसतात. ज्या वेळेस गरज असते तेव्हा आप्तस्वकीय, सारेच पाठ फिरवतात. आपली पुस्तके, आपला अभ्यास हेच आपले नातेवाईक समजायचे. पोरांनी हे मनात ठेवलं आणि वाटचाल सुरू झाली. लोको पायलट झाल्यानंतर बादलला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंद त्याच्या बहिणीला झाला.बुद्धविहारात केला अभ्यासबादल गावातील बुद्धविहारात रात्रभर अभ्यास करायचा. त्याने आपले ध्येय समोर ठेवून त्यासाठी परिश्रम घेतले. त्याचे परिश्रम फळाला आले असून त्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून रेल्वेत लोको पायलट म्हणून अलीकडेच पदभार स्वीकारला आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके