शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्ग देतोय अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने या राज्यमार्गावर बेशमरची झाडे लावून आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत या रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र यानंतर पुन्हा या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गोंदिया, गोरेगाव, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव यादरम्यान काही ठिकाणी कामे करण्यात आली.

ठळक मुद्देवडसा-अर्जुनी मोरगाव-कोहमारा मार्ग : वाहनचालकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा राज्य महामार्ग क्र मांक २७५ आहे. हा राज्य महामार्ग केवळ आता नावापुरताच उरला आहे. महामार्ग पूर्णपणे उखडला असून यावरून वाहन चालविण्यासाठी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने हा राज्य महामार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे.मागील २-३ वर्षांपासून या महामार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्ता उखडलेला असून गिट्टी बाहेर निघालेली आहे. १८ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने या राज्यमार्गावर बेशमरची झाडे लावून आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत या रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र यानंतर पुन्हा या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गोंदिया, गोरेगाव, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव यादरम्यान काही ठिकाणी कामे करण्यात आली. तर काही ठिकाणी रस्ता बांधकाम होणे बाकी आहे. अनेक दिवसांपासून सीडी वर्कचे काम कासवगतीने सुरू आहे. हे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.तर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या राज्य महामार्गाची दुरूस्ती न झाल्यास वाहनचालकांची प्रचंड अडचण होणार असून अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात अर्जुनी-मोरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता यावर्षी या रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी असून पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्य महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पुन्हा वर्षभर त्रास सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक