शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

दुपारपाळीत लोकल गाडी सुरू करा

By admin | Updated: April 1, 2015 00:46 IST

सालेकसा रेल्वे स्टेशनवरून लाईन मार्गावर गोंदिया-नागपूरकडे जाण्यासाठी सकाळी ९ वाजता पासून सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुमारे आठ तास कोणतीच रेल्वे सेवेची सोय नाही.

सालेकसा : सालेकसा रेल्वे स्टेशनवरून लाईन मार्गावर गोंदिया-नागपूरकडे जाण्यासाठी सकाळी ९ वाजता पासून सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुमारे आठ तास कोणतीच रेल्वे सेवेची सोय नाही. त्यामुळे या दरम्यान सालेकसा तालुक्यातील लोकांना स्वस्त रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर रेल्वे सेवेअभावी सामान्य प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी कर्मचारी वर्गाची मोठी गैरसोय घेत असते. दुपारच्या दरम्यान दुर्ग-इतवारी किंवा डोंगरगड इतवारी लोकल गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी सालेकसा तालुकावासीयांनी केली आहे. सालेकसा तालुक्यातून मुंबई-हावडा रेल्वे मार्ग गेला असून तालुक्याला एकूण तीन रेल्वे स्टेशन लाभले आहेत. यात दरेकसा आणि धानोली येथे फक्त काही लोकल गाड्याचाच थांबा आहे. तर सालेकसा रेल्वे स्टेशनवर सहा लोकल गाड्या आणि दोन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. सांगायला आठ गाड्यांचा थांबा आहे परंतु त्याचा लाभ सालेकसावासीयाना तेवढा घेता येत नाही. कारण की सालेकसा रेल्वे स्टेशनवरून विचार केला तर या सर्व गाड्या सायंकाळ ते सकाळच्या दरम्यान धावणाऱ्या जास्त आहे. परंतु सकाळ ते सायंकाळ दरम्यान विशेष करून दुपारी एक ही गाडीची सोय या स्टेशनवर नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सेवेचा लाभ मिळत नाही. सालेकसा तालुक्यात गरीब आदिवासी, सामान्य शेतकरी, शेतमजूर वर्ग मोठ्या प्रमाणात त्याला आपल्या रोजच्या मजुरीवर जास्त अवलंबून राहावे लागत असते. अशा वर्गाला रेल्वेचा स्वस्त प्रवास परवडणारा असतो. परंतु गरजेच्या वेळी रेल्वे गाडीची सोय नसल्याने सामान्य प्रवाश्यासोबतच व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी आदी लोकांना सुध्दा रेल्वेने प्रवास करण्याचा लाभ मिळत नाही. सालेकसा हा तालुका मुख्यालयाचा ठिकाण असून येथील ग्राम पंचायत समाप्त करून आता नगर पंचायतचे स्वरूप देण्यात येत आहे. त्याच बरोबर मुख्यालयाचा व परिसराचा विकासात्मक विस्तार वेगाने होत आहे. अशावेळी स्वाभाविकरित्या येथे ये-जा करणाऱ्याची व प्रवाशाची संख्या वाढत चालली आहे. ही बाब लक्षात सालेकसा रेल्वे स्टेशनवर दुपारच्या वेळेत ये-जा करणाऱ्या लोकल गाड्या दुर्ग-गोंदिया, डोंगरगड-इतवारी दरम्यान सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)