शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाऱ्यांवर पथकाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

व्यवसायीकांना दुकानात फिजिकल डिस्टंन्सिगचे पालन, हँडवॉश-सॅनिटायजरची व्यवस्था, किमान कर्मचारी, ग्राहकांची नोंद, मास्क लावणे, तंबाखू-गुटखा न खाणे व थूंकणे आदि नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र व्यवसायी व नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत मनमर्जीने वागत आहेत. यामुळे शिथिलतेतून नुकसान उद्भवण्याची स्थिती दिसून येत आहे.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना : कारवाईचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने ‘लॉकडाऊन’ शिथिल करीत दैनंदिन व्यवहारांना परवनगी दिल्याने बाजारपेठ पुन्हा फुगून निघाली आहे. मात्र ही परवानगी नियमांच्या अधीन राहूनच असल्याचा कित्येकांना विसर पडल्याचे दिसत आहे. कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बगल दिली जात असल्याने नगर परिषदेने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व नियमांची अंमलबजावणी व्हावी यावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक गठीत केले आहे. या पथकाची बाजारपेठेतील सर्वच हालचालीवर नजर असून नियम मोडणाऱ्यांना कारवाईचा दणका दिला जाणार आहे.कोरोनामुळे अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. त्यातही सुमारे दीड महिने ‘लॉकडाऊन’ कठोर असल्याने जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य सर्व व्यवसाय बंद होते. यामुले मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली असतानाच व्यापारी व सामान्य नागरिकांचीही चांगलीच अडचण झाली. या दोन्ही बाजू सांभाळून घेण्यासाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ शिथिल करीत सर्व व्यवसायांना परवानगी दिली. मात्र नियमांच्या अधीन राहून देण्यात आलेल्या परवानगीचा कित्येकांना विसर पडल्याचे दिसत आहे. व्यवसायी आपल्या व्यवसायासाठी तर सामान्य नागरिक आपली सुविधा बघत नियमांना बगल देत आहेत.व्यवसायीकांना दुकानात फिजिकल डिस्टंन्सिगचे पालन, हँडवॉश-सॅनिटायजरची व्यवस्था, किमान कर्मचारी, ग्राहकांची नोंद, मास्क लावणे, तंबाखू-गुटखा न खाणे व थूंकणे आदि नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र व्यवसायी व नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत मनमर्जीने वागत आहेत. यामुळे शिथिलतेतून नुकसान उद्भवण्याची स्थिती दिसून येत आहे. करिता बाजारपेठेत सुरू असलेल्या या सर्व व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी नगर परिषदेने विशेष पथक गठीत केले आहे. हे पथक बाजारातील तसेच अवघ्या शहरावर नजर ठेवून आहे. पथकाला कोठेही नियमांचे उल्लंघन दिसून आल्यास त्यांन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग अधिनियम १९८७ व इतर अनुषंगीक कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.परिसर ठरवून देत तीन पथकांचे गठननगर परिषदेने शहरातील बाजारपेठेवर विशेष नजर ठेवण्यासाठी ३ पथक गठीत केले असून त्यांना परिसर ठरवून दिलेला आहे. यामध्ये बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा यांच्या नेतृत्वातील पथक सिंधी कॉलनी, झुलेलाल गेट, नगर परिषद- जयस्तंभ चौक ते मनोहर चौकपर्यंत कार्य करेल. परवाना निरीक्षक श्याम शेंडे यांच्या नेतृत्वातील पथक इंगळे चौक-नेहरू चौक-स्टेडियम परिसर, खोजा मस्जीद चौक-दुर्गा चौक पर्यंत कार्य करेल. तसेच कर निरीक्षक प्रदीप घोडेस्वार यांच्या नेतृत्वातील तिसरे पथक जुने श्रीजी लॉन, श्री टॉकीज-दिल्ली हॉटेल ते माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या घरापर्यंत कार्य करणार आहे. विशेष म्हणजे, या पथकांना ठरवून दिलेल्या या परिसरासह शहरात कोठेही नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करता येणार आहे.