शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी प्रकल्पग्रस्तांसाठी २१ कोटींचे विशेष पुनर्वसन पॅकेज

By admin | Updated: June 28, 2017 01:30 IST

बिरसी विमानतळाचा विस्तार व नविनीकरण काँग्रेस सरकारच्या काळात झाले होते. मोठ्या प्रमाणात तेथील लोकांना हाकलून

विनोद अग्रवाल : प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप दाखवित असल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बिरसी विमानतळाचा विस्तार व नविनीकरण काँग्रेस सरकारच्या काळात झाले होते. मोठ्या प्रमाणात तेथील लोकांना हाकलून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांना रस्त्यावर आणण्याचे कार्य काँग्रेस सरकारने केले होते. काँग्रेस सरकारचे शेतकरीविरोधी धोरण व शेतकऱ्यांना उपाशी ठेवणाऱ्या नेत्यांनी सरकार असताना काहीच केले नाही. आज मात्र केंद्रातील भाजप सरकारने बिरसीच्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यासाठी २१ कोटींचे विशेष पुनर्वसन पॅकेज दिले असता प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप देऊन नेता खोटी वाहवाह लुटत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी पत्रकातून केले. बिरसी विमानतळातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा करून पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्याची मागणी केली होती. यावर खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्त भागाचा दौरा करून जिल्हाधिकाऱ्याना पॅकेजचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. तसेच खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाची केंद्रीय नागरिक विमानन मंत्री अशोक गजपती राजू सोबत भेट घालून त्यांच्या स्थितीशी अवगत करवून पॅकेजची मागणी केली होती. राज्य सरकारच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या २१ कोटींच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूर केले व त्याचा लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळणार आहे. शासनाची पारदर्शी भूमीका असल्याचे अग्रवाल यांनी सांगीतले.