प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:35+5:30
शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या निकालात काढण्यात याव्या यासाठी अनेकदा चर्चा करण्यात आली. मात्र अद्यापही त्या मार्गी लावण्यात आल्या नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष व्याप्त आहे. शिक्षकांचे वेतन १ तारेखला देण्यात यावे असे शासनाचे धोरण असताना व संघटनेच्यावतीने सतत पाठपुरावा करुनही प्रत्येक महिन्याला १ तारखेला वेतन होत नाही.

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्या मार्गी लावण्यात याव्या. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारीणीच्यावतीने जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या निकालात काढण्यात याव्या यासाठी अनेकदा चर्चा करण्यात आली. मात्र अद्यापही त्या मार्गी लावण्यात आल्या नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष व्याप्त आहे. शिक्षकांचे वेतन १ तारेखला देण्यात यावे असे शासनाचे धोरण असताना व संघटनेच्यावतीने सतत पाठपुरावा करुनही प्रत्येक महिन्याला १ तारखेला वेतन होत नाही. यासाठी सीएमपी प्रणाली लागू करुन वित्त विभागातूनच सरळ शिक्षकांच्या खात्यावरच वेतन जमा करण्यात यावा. डीसीपीएसधारक शिक्षकांच्या वेतनातून २०११ पासून कपात करण्यात आलेल्या सीपीएफ राशीच्या हिशोबाची पावती आजपर्यंत मिळाली नाही.
यामुळे कपात केलेल्या राशीचा हिशोब सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत शिक्षकांमध्ये शंका आहे. त्यामुळे पावती देण्यात यावी. ६ व्या वेतन आयोगाच्या जीपीएफमध्ये जमा होणारे ५ हप्त्याची रक्कम जमा झाली की नाही याची माहिती शिक्षकांना नाही म्हणून पाच हप्त्याची जमा झालेल्या राशीची स्वतंत्र पावती देण्यात यावी. वार्षिक पावतीवर ५ हप्त्याची स्वतंत्र नोंद करण्यात यावी. १२ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. जिल्ह्यातील उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे रिक्त असलेल्या जागा भरण्यात यावे, विषय शिक्षकांच्या सुध्दा रिक्त जागा भरण्याची मागणी करण्यात आली.
विषय शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेतनवाढ लागू करण्यात यावी. शाळांचे वीज बिल १४ व्या वित्त आयोग रक्कमेतून भरण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.
शिष्टमंडळात जिल्हा नेते आनंद पुंजे, नाननबाई बिसेन, टी. के. नंदेश्वर, जितेंद्र डहाटे, रेणूका जोशी, डी.टी. कावळे, एस.यू.वंजारी, के. एस. रहांगडाले, ए.डी.धारगावे, किशोर पटले, अजय चौरे, डी.के.चव्हाण, एम.बी. तरनपुरे, अनिल वट्टी, अशोक तावाडे, अशोक रावते, एच.एम.रहांगडाले, तुषार ढोमणे, के.बी.शहारे, डी.पी.कोसरकर, सी.एस.बागडकर, विरेंद्र भिवगडे, अरुण शिवणकर, राजू भरडे, पी.ए.कापगते, अर्जुन वासनिक, प्रकाश कुंभारे, एस.आर. सांगोडे, रमेश उईके, रोषण टेंभुर्णे, व्ही.एस.मानकर, जितू गणवीर, राजेश वट्टी, के. आर. कापसे, डी.एम.दखणे, डी.एच.लाडे, धनपाल पटले, एस.आर.बारई यांचा समावेश होता.