शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा फायदा घेतला काही किराणा दुकानदारांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्न धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू कमी पडू नयेत, यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी सूचना दिल्या. परंतु अनेक किराणा दुकानदारांनी आपापल्या दुकानातील साहित्य त्याच दरात न विकता मोठ्या प्रमाणात किंमत वाढविली आहे. ३२ रूपये किलोच्या दराने मिळणारी साखर ४० रूपये, ७० रूपये किंमतीची डाळ १०० रूपयांच्या पलीकडे गेली आहे. ८० रूपये किलो असलेले खाद्य तेल १४० रूपयावर गेले आहे.

ठळक मुद्देअनेक साहित्यांची किंमत दुप्पट : प्रत्येक वस्तूची विक्री वाढीव दराने, ग्राहक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या लॉकडाऊनचा गैरफायदा काही किराणा दुकानदार घेत आहेत. गोरगरीबांना अव्वाच्या सव्वा दरात साहित्य विक्री केली जात आहे. काहींनी मालाची साठेबाजी करून ठेवली आहे. परंतु पुरवठा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्न धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू कमी पडू नयेत, यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी सूचना दिल्या. परंतु अनेक किराणा दुकानदारांनी आपापल्या दुकानातील साहित्य त्याच दरात न विकता मोठ्या प्रमाणात किंमत वाढविली आहे.३२ रूपये किलोच्या दराने मिळणारी साखर ४० रूपये, ७० रूपये किंमतीची डाळ १०० रूपयांच्या पलीकडे गेली आहे. ८० रूपये किलो असलेले खाद्य तेल १४० रूपयावर गेले आहे. मागील काही दिवसातच हा बदल किराणा दुकानदारांकडून करण्यात आला आहे.याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा निरीक्षक यांनी लक्ष देऊन गोरगरीबांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.साठेबाजांवर कारवाई कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी केली आहे. त्यांचे गोदाम तपासण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुक्यातील निरीक्षक यांनी पुढे यावे. गोरगरीबांना योग्य दरातच त्यांना साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी यासंदर्भात किराणा दुकानदारांकडे बोगस ग्राहक पाठवून त्यांची माहिती काढणे आवश्यक आहे. साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. त्यावर गोंदिया जिल्ह्यात एकही साठेबाजावर कारवाई झाली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या