शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ समाजशील शिक्षकाची अनाथ मुलांशी नाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

अनिल मेश्राम असे त्या समाजशिल शिक्षकाचे नाव आहे. ते सडक अर्जुनी येथील जि.प.शाळेत कार्यरत आहे. जिल्ह्यात अनाथाची माय म्हणून काम करणाऱ्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांच्या कार्याला समरस होऊन शिक्षक मेश्राम वेळोवेळी अनाथ मुलांना आवश्यक साहित्यासह, शालेय पुस्तकांचा पुरवठा करीत असतात.

ठळक मुद्देखूप शिका, मोठे व्हा : जीवनोपयोगी वस्तु, रोख रक्कम भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जन्म देणारे माय-बाप असले तरी मुलांना सुसंस्कार देऊन त्यांचे भाग्य फळास नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एक शिक्षकच करतो. हल्लीच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबीय संसाराशिवाय ईतरांच्या दु:खात सहभागी होण्याची उसंत मिळत नाही, असे सर्वत्र दिसत असले तरी आजही मुळातच भुतकाळातील आपले दैनंदिन जीवनाची आठवण करुन समाजातील वंचित, गरीब, पीडितांना आपला हातभार लावून त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचे काम एक समाजशील शिक्षक करीत आहे.अनिल मेश्राम असे त्या समाजशिल शिक्षकाचे नाव आहे. ते सडक अर्जुनी येथील जि.प.शाळेत कार्यरत आहे. जिल्ह्यात अनाथाची माय म्हणून काम करणाऱ्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांच्या कार्याला समरस होऊन शिक्षक मेश्राम वेळोवेळी अनाथ मुलांना आवश्यक साहित्यासह, शालेय पुस्तकांचा पुरवठा करीत असतात. अलीकडेच सामाजिक दायित्व अंगिकारुन त्यांनी बोंडगावदेवी परिसरातील अनाथ मुलांसोबत अख्खा एक दिवस घालवून त्या अनाथ मुलांना पालकत्वाची जोड दिली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनाथ मुलांना सर्वोतोपरी मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असणारे सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी अनाथ मुलांच्या भेटीचा योग घडवून आणला. बाक्टी येथील अनाथ भावंड स्रेहा व विराज मेश्राम, बोंडगावदेवी येथील उमेश गोंधळे, अमित गोंधळे यांच्या घरी जाऊन त्या समाजशिल शिक्षकांनी भेट घेतली.त्या अनाथांच्या अडचणी जाणून घेतल्या.मोठ्या आस्थेनी विचारपूस केली. तेल, साखर, किराणा सामान व जिवनावश्यक वस्तु तसेच रोख रुपयांचा आर्थिक मदतीचा हात दिला.अनाथांच्या झोपडीवजा घरकुलात त्यांच्यासोबत वेळ घालविला. त्यांचेशी हितगुज साधून शिक्षण घ्या, खूप मेहनत घेऊन सुसंस्कारासह जीवनात यशस्वी व्हा. कोणतीही अडचण आल्यास नि:संकोच सांगा. मदतीला धावून येऊन परंतु परिस्थितीने खचू नका. सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी पालकत्वाची जबाबदारीची जाणीव त्यांनी करुन दिली. याप्रसंगी त्या अनाथ मुलांच्या चेहºयावरील आनंदाने समाधान व्यक्त केले. अनाथ मुलांच्या घरी येऊन त्यांच्याशी हितगुज साधल्याने तसेच त्यांच्या सोबतीने मन:स्वी समाधाने झाल्याने समाजशिल शिक्षक अनिल मेश्राम यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी