शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत लॉकडाऊनचा ४६११ वाहन चालकांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने सुरू केली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर आल्यास खैर नाही : ९ लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कारोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते १८ एप्रिलच्यापर्यंत ४ हजार ६११ वाहन चालकांना दंड आकारून त्यांच्याकडून ९ लाख ५३ हजार ६०० रूपये दंड वसूलही केला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने सुरू केली आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या अश्या ४ हजार ६११ लोकांना २३ मार्च ते १८ एप्रिल या काळात दंड करण्यात आला आहे.चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची कडक अमंलबजावणी सुरू केली आहे. विनाकारण एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला व पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्या वाहन चालकाला थांबवून त्याच्या वाहनात किंवा वाहन चालवितांना कोणत्या ना कोणत्या तृट्या दाखवून पोलीस कारवाई करीत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलीस आणखीच कडक नियम लावून कारवाई करीत आहे. हे कडक नियम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे. २३ मार्चपासून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.दुचाकी, चारचाकी अशा ४ हजार ६११ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ लाख ५३ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे हा एकमेव या मागील उद्देश आहे. रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण नसताना वाहन रस्त्यावर आले की त्या वाहनाला दंड कसा करायचा याच्याच प्रयत्नात वाहतूक पोलीस दिसत आहेत. हे जरी वाहन चालकांना योग्य वाटत नसले तरी आजघडीला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी ही कारवाई समाजाच्या हिताची आहे. दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाहीत आणि कोरोनाच्या लढाईत सर्व जिंकतील हा या मागील उद्देश आहे.चार दिवसात २.२३ लाख वसूल१५ ते १८ एप्रिलच्या दुपारपर्यंत या लॉकडाऊनच्या काळात १०६६ वाहनांवर दंड आकारण्यात आला. परंतु मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात कारवाई करायला पोलिसांनी सुरूवात केली आहे. या चार दिवसात २ लाख २२ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.५५० वाहन जप्तपोलिसांनी मोटारवाहन कायद्यांतर्गत ५५० वाहन जप्त केली होती. त्या सर्व वाहनांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्यांना दंड आकारून सोडण्यात आले आहेत.सद्या कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता नागरिकांनी अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. सर्वांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाळावी. घरातच राहून सहकार्य करावे. वारंवार समजावूनही विनाकारण रस्त्यावर येणाºया वाहन चालकांना दंड आकारावाच लागेल.- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.

टॅग्स :Policeपोलिस