शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
4
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
5
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
6
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
7
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
8
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
9
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
10
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
11
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
12
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
14
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
15
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
16
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
17
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
18
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
19
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
20
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

अनेक पालेभाज्यांतून मिळतेय ‘स्लो पॉयझन’

By admin | Updated: June 11, 2014 00:08 IST

पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या

रावणवाडी : पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या किटकनाशकांचा दुष्परिणाम होवून पालेभाज्यांची पौष्टीकता पूर्णत: संपुष्टात येत आहे. अशा पालेभाज्यांचा आहारात उपयोग केल्याने एकप्रकारे ‘स्लो पॉयझन’च नागरिक ग्रहण करीत आहेत.
किटकनाशक औषधांची फवारणी पालेभाज्यांवर केले जाते. त्यामुळे त्या पालेभाज्यातील विषारी घटक सेवनातून शरीरात प्रवेश करतात. यातून संपूर्ण शरीरच स्लो-पॉयझनच्या विळख्यात सापडले आहे. पिकाचे भरघोष उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यामार्फत पिकावर नाना प्रकारच्या विषारी किटकनाशकांची फवारणी केली जाते. परंतु किटकनाशक औषधीच्या अति वापरामुळे किटकनाशक शरीरात भिनू लागले आहे. भाजीपाल्यातील जीवनसत्त्व व मानवी शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक नाश पावतात. किटकनाशकांच्या फवारणीमुळे संपूर्ण भालेभाज्या विषारी बनल्या आहेत.
शेतकरी पालेभाज्यावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी व भरघोष उत्पन्न मिळविण्यासाठी स्वत:च्या मनाप्रमाणे वाट्टेल त्या किटकनाशक औषधीची फवारणी मोठ्या प्रमाणात करतात. एखादी किटकनाशक किती प्रभावी आहे, त्यापासून किती फायदे आहेत, त्यामुळे त्या रोगावर नेमक्या याच औषधाची फवारणी करावी, अशी माहिती दर्शविणाऱ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीचे मोठाले फॅन्सी होर्डिंग्स, फलक व वॉल पेंटिंग ठिकठिकाणी लागलेल्या आढळतात. मात्र या कंपन्यांच्या जाहिरातीमागील सत्यता कुणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. सद्यस्थितीत बाजारात बोगस कंपन्यांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. मात्र हा गंभीर प्रकार समजून घेण्यासाठी शासनाची तपास यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. बोगस कंपनीच्या घातक किटकनाशकाबद्दल जनतेत जाणीव निर्माण करून देण्याची आता गरज आहे.
कृषी कार्यालयाकडून वेळोवेळी मेळाव्यांचे आयोजन केले जात नाही. अधिकारी व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणती औषध किती वेळा व किती प्रमाणात वापरावी याची जाणीव नाही. औषध उत्पादकही त्या औषधांना विषारी करतात. शेतकरी अशा औषधांची फवारी पिकावर करतात. असा प्रकार चोहीकडे सुरू आहे. शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देवून रासायनिक खताचा व विषारी किटकनाशकांचा भरमसाठ उपयोग करीत आहेत.
हा प्रकार पालेभाज्यांसाठी व इतर पिकांसाठी अत्यंत घातक असून मानवी आरोग्यावर थेट परिणाम करीत आहेत. अशा पालेभाज्यांची भाजी बाजारात राजरोसपणे खरेदी-विक्री व उपयोग केला जात आहे. नागरिकही हिरव्या पालेभाज्या पौष्टीक असतात म्हणून मोठ्या आवडीने खरेदी करतात. मात्र कृषी विभागाला सक्रिय करण्याची आज गरज आहे. (वार्ताहर)