शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून बहिणीनेही सोडला जीव

By admin | Updated: December 20, 2014 22:41 IST

बहीण-भावातील प्रेमाची सर दुसऱ्या कोणत्याही नात्यातील प्रेमाला येत नाही. भावाबहिणीतील मायेमुळेच त्यांचा जीव एकमेकांमध्ये गुंतलेला असतो. याचाच प्रत्यय कालीमाटी व कलपाथरी येथील गावकऱ्यांना आला.

ओ.बी.डोंगरवार - आमगाव
बहीण-भावातील प्रेमाची सर दुसऱ्या कोणत्याही नात्यातील प्रेमाला येत नाही. भावाबहिणीतील मायेमुळेच त्यांचा जीव एकमेकांमध्ये गुंतलेला असतो. याचाच प्रत्यय कालीमाटी व कलपाथरी येथील गावकऱ्यांना आला. भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून बहिणीनेही देह त्यागल्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कालीमाटी येथील सुखदेव महारू रहांगडाले (३५) याचे कातुर्ली गावाजवळ त्यांचाच मॅटाडोर उलटल्याने मृत्यू झाला. भावाच्या मृत्युची बातमी सुखदेवची मोठी बहीन एननबाई बिसेन यांना समजताच त्या बेशुद्ध होऊन पडल्या. काही तासांनी त्यांनीही मृत्यूला जवळ केले.
सुखदेव रहांगडाले यांचा कालीमाटी येथे वीटांचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वत:च्या मॅटाडोरने सासरे चंद्रशेखर ठाकुर मु.चुलोद यांच्याकडून विटा बनविण्याकरीता लागणारा भसवा घेतला आणि ते गावाकडे येत होते. मात्र काळाने त्यांच्यावर झडप घातली व कातुर्ली गावाजवळ त्यांची मॅटाडोर उलटला. त्यातच सुखदेव गंभीर जखमी होऊन ठार झाले. मॅटाडोर स्वत: सुखदेव चालवित होते. शुक्रवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. गाडीत सुखदेवचा साळा होता. त्यालापण दुखापत झाली. उपचाराकरीता गोंदिया येथे हलविण्यात आले.
सुखदेवच्या मृत्युची बातमी मोठी बहीण एननबाई हेकलाल बिसेन मु.कलपाथरी ता.जि.बालाघाट यांना रात्री ९ वाजताच्या सुमारास कळविण्यात आली. भावाच्या मृत्युची बातमी ऐकताच एननबाई बेशुद्ध पडल्या. त्यांना त्याच अवस्थेत गोंदिया येथे आणण्यात आले. मात्र डॉक्टरच्या सांगण्यानुसार ऐननबाईची जिवंत राहण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे त्यांना बेशुद्ध अवस्थेतच मृतक सुखदेवच्या घरी कालीमाटी येथे आणले.
यावेळी रात्रीचे १२ वाजले होते. अर्धवट बेशुद्ध अवस्थेतच त्यांनी आपल्या भावाचे अंत्यदर्शन घेतले व कलपाथरी येथे शनिवारी पहाटे ३ वाजताच्यादरम्यान मृत्युला जवळ केले.
या दोन्ही बहीणभावाचा मृत्यू कालीमाटी व कलपाथरी परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. मृतक सुखदेवच्या मृत्युनंतर तपासणी करीत आमगाव येथे ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते. पोस्टमार्टमनंतर प्रेत त्यांच्या कुटुंबियाच्या स्वाधीन करून दुपारी कालीमाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.