शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

शशीकरण पहाडीजवळील बंधारा ठरतोय नाममात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत शशीकरण देवस्थान आहे. आदिवासी समाजाचे आराध्या दैवत म्हणून या पहाडीवर पूजा अर्चा केली जाते. दर सोमवारी भाविक येथे येतात. तसेच श्रध्देने मंदिराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या शशीकरण नदीवर जाऊन अंघोळ करतात.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील शशीकरण पहाडीजवळ शासनाने लाखो रुपये खर्चून बंधारा तयार केला. मात्र या बंधाऱ्याव्दारे कुठलेच सिंचन होत नसल्याने या बंधाऱ्यांचा शेतकऱ्यांना सुध्दा फायदा होत नाही.बंधाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाने सुध्दा दुर्लक्ष केल्याने हा बंधारा केवळ नाममात्र ठरत आहे.तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत शशीकरण देवस्थान आहे. आदिवासी समाजाचे आराध्या दैवत म्हणून या पहाडीवर पूजा अर्चा केली जाते. दर सोमवारी भाविक येथे येतात. तसेच श्रध्देने मंदिराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या शशीकरण नदीवर जाऊन अंघोळ करतात. तत्कालीन माजी मंत्री व आमदार यांच्या प्रयत्नाने भाविकांची आंघोळीची सोय व्हावी, यासाठी बंधाऱ्याचे नियोजन करून बांधकाम करण्यात आले. मात्र या बंधाऱ्यांच्या बांधकामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे बंधाऱ्यांत पाणी साचून राहत नाही. परिणामी भाविकांची सुध्दा गैरसोय होत आहे.या बंधाऱ्यामुळे नवेगावबांध-नागझिरा अभयारण्यातील वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय झाली असती. या परिसरात उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.त्यामुळे या बंधाऱ्याची मदत होत होती. मात्र आता पाणी साचून राहत नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.या बंधाऱ्यामुळे परिसरातील बाम्हणी, खडकी, डोंगरगाव,देवपायली, डुग्गीपार आदी गावातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी मदत होऊ शकते. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडताना वन्यप्राण्यांचे जाणारे जीव सुध्दा वाचविणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग