शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

लोक अदालतीत १७३५ प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: December 18, 2014 22:56 IST

न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व पक्षकारांना न्याय मिळावे यासाठी जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय व जिल्ह्यातील इतर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय

गोंदिया : न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व पक्षकारांना न्याय मिळावे यासाठी जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय व जिल्ह्यातील इतर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीत जिल्ह्यातील १७३५ प्रकरणे निकाली काढण्यात आले.
जिल्हा सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत १ हजार ६३ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यात गोंदिया न्यायालयातील ४९५, तिरोडा न्यायालयातील ३४२, अर्जुनी/मोरगाव न्यायालयातील २५, सडक/अर्जुनी न्यायालातील ३३, आमगाव न्यायालयातील १५३, देवरी न्यायालयातील १५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील गोंदिया न्यायालयातील ७०, तिरोडा न्यायालयातील १६, अर्जुनी/मोरगाव न्यायालयातील ९, सडक/अर्जुनी न्यायालातील ५, आमगाव न्यायालयातील १२४, देवरी न्यायालयातील ४, सहायक धर्मादाय आयुक्त गोंदिया ६३, कामगार न्यायालय गोंदिया १५, ग्राहक मंच गोंदिया ५ अशी एकूण ३११ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
बँक व बीएसएनएलची न्यायप्रविष्ठ असलेले ३६० प्रकरणे निकाली काढण्यात आले. गोंदिया न्यायालयातील १५२, तिरोडा न्यायालयातील ३३, अर्जुनी/मोरगाव न्यायालयातील २०, सडक/अर्जुनी न्यायालातील २१, आमगाव न्यायालयातील १०७, देवरी न्यायालयातील २७ व अन्य एक प्रकरणे निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय लोक अदालतीत विदर्भ कोकण ग्रामीण बँक, बँक आॅफ इंडिका, बँक आॅफ महाराष्ट्र, युनियन बँक, देना बँक, महात्मा फुले सहकारी बँक, इंडस इंड बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया व बीएसएनएल यांचे न्याय प्रविष्ठ असलेले प्रकरणे ठेवण्यात आले होते. दोन्ही पक्षकारांचे ऐकून दोघांना मान्य होईल अशा अटीवर तडजोड करण्यात आली. जिल्ह्यात १५ पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात एक न्यायाधीश, एक वकील एक सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायाधिश आर.जी. अस्मार, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक एन.एल.शेंडे, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश निखील मेहता, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.एम. सुंदाळे, सह दिवाणी न्यायाधीश, ए, आर, सिंघेल, सहदिवाणी न्यायाधीश व्ही.एम. भगत, मेश्राम, सहायक धर्मादाय आयुक्त रेहपाडे, वर्षा पाटील, सह दिवाणी न्यायाधीश एस.पी. सदाफळे, देवरीचे न्यायाधीश एस.डब्लू ठोंबरे, आमगावचे न्यायाधीश एम.डी. दुधे, आर.के. पुरोहित, अर्जुनी/मोरगावचे न्यायाधीश एम.ब. कारर्लेकर, आर.एस. पातनकर, एड.डी. सावरकर, जिल्हा वकिल संघाचे सर्व तालुक्यातील वकील व कार्यकर्ते उपस्थित होते.
या लोक अदालतीत विविध बँकेचे शाखा व्यवस्थापक एस.एन. घोटकर, ए. डब्लू, पालांदुरकर, एस.बी. दमाहे, बी.एन. बोरिकर, एम.एम. सोमवंशी, आर. वाय. राणे, व्ही.एम. शेख, एस.एन. भोंगडे, व्ही.व्ही. मानेकर, ए.जी. चौधरी, आर.एस. ठवरे, एस.एम. अंबुले, एस.जे. राऊत उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)